AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : मीटिंगमध्ये तरूणीला पायाने स्पर्श, शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत जे घडलं, वाचूनच अंगाचा होईल तिळपापड!

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विविध आमिषं दाखवून अश्लील वर्तन, विनयभंग आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime : मीटिंगमध्ये तरूणीला पायाने स्पर्श, शरीराशी झटापट आणि..  नाशिकच्या कंपनीत जे घडलं, वाचूनच अंगाचा होईल तिळपापड!
नाशिक आयटी कंपनीतील घृणास्पद प्रकारImage Credit source: social media
| Updated on: Apr 12, 2026 | 9:02 PM
Share

नाशिक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, भोंदू खरात आणि नराधम पत्रकार रवींद्र एरंडे केसनंतर सध्या नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे अख्खं राज्य हादरलं आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील नामांकित आयटी (IT) कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण तसेच त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलं होतं, तसेच एका तरूणावरही धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचं उघड झालं होतं. अत्यंत हादरवणाऱ्या अशा या घटनेतील एकेक कृत्यांचा आता पर्दाफाश होत आहे. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या तरूणींना चांगल्या करिअरचं स्वप्न दाखवत, त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं, त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, एवढंच नव्हे तर त्यांचे धर्मांतर करून विशिष्ट धर्माची संस्कृति लादण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तपास सुरू असून कंपनीतील आरोपी हे फक्त पुरूष नव्हे तर त्यात महिलांचाही समावेश होता, ते Whatsapp ग्रुप बनवून पुढचं टार्गेट ठरवायचे ही माहिती नुकीतच उघड झाली होती. आता याचसंदर्भात एक हादरवणारी अपडेट समोर आली आहे. या नामांकित कंपनीतील हिंदू मुलींशी प्रेमाचं नाटक केलं जायचं, त्यांना वेगेवगळी आमिष दाखवली जायची आणि त्यांच्यासोबतक अश्लील कृत्य सुरू होतं. आरोपींची मोडस ऑपरेडी कशी होती हेही समोर आलं आहे..

पायाने स्पर्श आणि नंतर लॉबीमध्ये शरीराशी झटापट

कंपनीत काम करणाऱ्या तरूणी व महिला यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात यायचे, त्यांचा विनयभंग केला गेला आणि धर्मांतराचाही दबाव टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या नामांकित कंपनीत एक हिंदू मुलगी काम करायची, तिच्या शरीराला स्पर्श करत, तिला प्रेमात अकवण्याचा प्रयत्न केला जात होता. तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवली जायची, तसेच तर अश्लील कृत्यही सुरू होती. एवढंच नव्हे तर तिच्याशी अश्लील कृत्य करताना फोटो व्हिडिओ काढले जायचे, ते व्हायरल करू, कुटुंबियांना दाखवू, अशी भीती घालत त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात होता असा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. ऑफीसमध्ये मीटिंग असेल तेव्हा, तसेच कामाची वेळ असेल तेव्हा तरूणीवा पायाने स्पर्श केला जायचा, सगळ्यात भयानक म्हणजे, नंतर लॉबीत तिला गाठून तिच्या शरीराशी झटापट करून विनयभंगही केला जात होता अशी हादरवणारीह माहितीही तपासात समोर आली आहे.

हिंदू देव-देवतांचा अपमान, विकृत अर्थ, अश्लील शेरेबाजी

हा प्रकार इथेच थांबला नाही, तर कंपीनीतल हे नराधम आरोपी केवळ शरीरावर नाही तर, श्रद्धेवरही घाव घालत होते. ते हिंदू देव-देवतांचा अपमान करून, पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून, अश्लील शेरीबाजी करत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांसोबत हा बयानक प्रकार घडत होता, मात्र हे आपल्या एकटीसोबतच असल्याचं त्यांना वाटत होतं, भीतीपायी त्या तोंड उघडत नव्हत्या, कुठे चर्चा करत नव्हत्या, मात्र हे सर्व फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचं कालांतराने उघड झालं. या प्रकरणात पोलिसांकडून कंपनीच्या टीम लीडरसह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला अद्याप फरार आहे.

Follow Us
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!