ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, भाजपने मागितली मनसेकडे टाळी

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि मनसे यांची गुप्त बैठक राजगड कार्यालयावर घेण्यात आली.

ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, भाजपने मागितली मनसेकडे टाळी

नाशिक : राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरुपी शत्रू नसतो, आणि कोणी कोणाचा मित्र नसतो, याचा प्रत्यय सध्या वारंवार येत आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अभूतपूर्व हातमिळवणी होऊन ‘महासेनाआघाडी’ महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नाशिक महापौरपदाच्या (Nashik Mayor Election) निवडणुकीत भाजपने चक्क मनसेकडे टाळी (BJP seeks help from MNS) मागितल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपविरोधात रान उठवलं होतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अप्रत्यक्षरित्या मदत करत राज ठाकरेंनी भाजपविरुद्ध प्रचार केला होता. परंतु आता स्थानिक पातळीवर मनसे भाजपशीच दोस्ती करणार की काय, याची चर्चा रंगली आहे.

भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सेना-भाजप युती दुसऱ्यांदा तुटल्यावर शिक्कामोर्तब झालं. सेनेची साथ सुटताच भाजपने नवा जोडीदार शोधण्याची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे. कारण नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि मनसे यांची गुप्त बैठक पार पडली. मनसेच्या राजगड कार्यालयावर ही बैठक घेण्यात आली.

आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत
मनसेचे पाच नगरसेवक किंगमेकर ठरणार आहेत. मनसेच्या 5 नगरसेवकांच्या भूमिकेवर नाशिकचा महापौर ठरणार आहे. मनसेच्या मदतीने भाजपला नाशिकमध्ये महापौर बसवता येणार का स्पष्ट होणार आहे.

महासेनाआघाडीचा पहिला विजय कोल्हापुरात, शिवसेना-काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर

भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांमधे गुप्त बैठक पार पडल्यावर दोन्ही पक्षांनी आमचे वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगून याबाबत बोलण्यास नकार दिला. तरी वेळ आल्यावर काय, ते कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया भाजपच्या वतीने देण्यात आली.

नाशिक महापौरपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. सध्या भाजपच्या रंजना भानसी या नाशिकच्या महापौर (BJP seeks help from MNS) आहेत, तर भाजपच्या प्रथमेश गीते यांच्याकडे उपमहापौरपदाची धुरा आहे.

नाशिक महापालिका पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
काँग्रेस – 07
राष्ट्रवादी – 07
मनसे – 05

भाजपकडे स्पष्ट बहुमत असलं तरी भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. तसं झाल्यास वेळेवर भाजप मनसेला सोबत घेऊन मॅजिक फिगरपर्यंत पोहचू शकते. त्यामुळे मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भाजप-सेनेची युती तुटल्यानंतर नाशिक महापालिकेत 2012 नंतर झालेल्या निवडणुकीतही भाजपने मनसेला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. यावेळी मनसेचा राज्यातला पहिला महापौर नाशिकमध्ये झाला होता. त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यातली ही युती पहिल्यांदाच होते, असं नाही. मात्र 2012 ते 2019 या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्याने राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष (BJP seeks help from MNS) लागलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *