Nashik Municipal Corporation Building Fire : नाशिक महापालिकेच्या इमारतीत आग

नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडलीय. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. | Nashik Municipal Corporation Building Fire news

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:19 PM, 22 Jan 2021
Nashik Municipal Corporation Building Fire :  नाशिक महापालिकेच्या इमारतीत आग
Nashik Municipal corporation fire

नाशिक : महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडलीय. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयाला ही आग लागलीय. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. (Nashik Municipal Corporation Building Fire news)

आगीची भीषणता खूपच तीव्र आहे. आगीच्या भक्षस्थानी असलेलं साहित्य जळून खाक झालेलं आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या रुमचे दरवाजे तोडलेले आहे. सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही. नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितेलं आहे.

आगीच्या पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या याठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सुदैवाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयात उपस्थितीत नव्हते.

घटनास्थळी बघायला मिळणारी दृश्य विदारक आहेत. एरव्ही याच शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांचा राबता असतो. अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची विविध कामांच्या निमित्ताने कार्यालयात ये जा असते. मात्र आज सुदैवाने सॅनिटायझिंगचं काम सुरु असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांशिवाय कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हतं.

सॅनिटायझरमुळे आग…?

आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती आणखी मिळाली नाही. मात्र कार्यालयात सॅनिटायझिंगचं काम सुरु होतं. यावेळी शॉर्ट सर्किंटमुळे आगीचा भडका उडालेला असता, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. (Nashik Municipal Corporation Building Fire news)