AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापालिका निवडणूकः 3 दिवसांत कच्ची प्रभाग रचना होणार अंतिम

नाशिक महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येणाऱ्या 3 दिवसांत कच्ची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याने अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे.

नाशिक महापालिका निवडणूकः 3 दिवसांत कच्ची प्रभाग रचना होणार अंतिम
नाशिक महापालिका.
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:51 PM
Share

नाशिकः नाशिक महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येणाऱ्या 3 दिवसांत कच्ची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याने अधिकाऱ्यांची धावपळ वाढली आहे. यात प्रामुख्याने 33 हजार मतदारांचा 1 प्रभाग होण्याची शक्यता आहे, तर 22 टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जाती जमातीची असल्याने प्रभाग रचनेच्या फेरबदलाचा अंतिम निर्णय महापालिका आयुक्त घेणार आहेत. त्यानंतरच ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सोपविली जाणार आहे.

नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. मात्र, आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा या कामात बदल करावा लागणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 3 3 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागत आहे. नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर महापालिकेसाठी 30 नोव्हेंबरची मुदत होती. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूरसाठी 18 नोव्हेंबर, तर लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगावसाठी 25 डिसेंबरची मुदत आहे. पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी हे काम 15 फेब्रुवारीपर्यंत करावे लागेल.

आयुक्तांची करडी नजर

प्रारूप प्रभाग रचनेच्या सध्या सुरू असलेल्या कामावर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी करडी नजर ठेवली आहे. प्रभाग रचना करताना कोणाला झुकते माप दिल्याचे आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय कच्ची प्रभारचना ज्या रूममध्ये सुरू आहे, तिथे सुरक्षा वाढवली गेली आहे. या रूममध्ये मोबाईल, पेन, पेन्सील, कागद आत नेण्यास आणि बाहेर आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

तिकीट मिळण्याआधीच प्रचार

नाशिक महापालिका निवडणुकीची अजून प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करणे सुरू आहे. त्यात नगरसेवकांचे तिकीट कुणाला मिळणार, हे ही संबंधित पक्षांनी जाहीर केलेल नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल अस गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणारी महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार, याच शंकाच नाही. (Nashik Municipal Election: Raw ward formation will be finalized in 3 days)

इतर बातम्याः

Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’

ST Strike Photo: संपाची धार तीव्र; उत्तर महाराष्ट्राची कोंडी!

निकाळजे म्हणतात, आमदारांवर गुन्हा दाखल करा; भुजबळ-कांदे वादाला नवे वळण

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.