AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरी प्रशासनाच्या कामात ‘या’ शहराने मारली बाजी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

राज्यातील नागरी कामांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कौतुक केले आहे. प्रशिस्तीपत्रक देऊन आयुक्तांचा सन्मान करण्यात आला आहे.

नागरी प्रशासनाच्या कामात 'या' शहराने मारली बाजी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Image Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2023 | 5:35 PM
Share

नाशिक : आज नागरी विकास दिन मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला. यामध्ये विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या महापालिकाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगर पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याने नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून गौरव करण्यात आला आहे. विक्रमी कर वसुली, एनयूएलएममध्ये अव्वल कामगिरी आणि प्रशासकीय खर्च कमी केल्याबद्दल नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सन्मान करण्यात आला आहे. 2022 – 23 मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये नाशिक महानगर पालिकेने विशेष कामगिरी केली आहे.

राज्यातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात आले आहे. मुंबईत नगर विकास दिनाच्या कार्यक्रम पार पडला त्यावेळी हा सन्मान करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये विशेषता विक्रमी कर संकलन, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानात अव्वल कामगिरी करण्यात आली आहे.

आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुक्त आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

कर वसूली विभागाने प्रभावी वसुली मोहीम राबवल्याने कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. 150 कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट होते. नाशिक मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच 125 टक्के वसुली झाली आहे. 188 कोटी 73 लाख रुपये इतका मालमत्ता कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

नाशिक मनपाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान अंतर्गंत सर्व घटकांमध्ये 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. बचत गट बनविणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची कामगिरी नाशिक मनपाने केली आहे.

स्वयंरोजगाराकरीत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रा अंतर्गंत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे या सर्व घटकांमध्ये मनपाने उत्कृष्ट काम केले आहे.

याशिवाय प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गंत महाराष्ट्रात 140 टक्के काम करुन मनपाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे.

प्रशासनाने मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आणि प्रभावी उपाययोजना राबवुन 33 टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादीत ठेवण्यात यश मिळविले आहे. या सर्व कामगिरीबद्दल नाशिक मनपाने मोठी कामगिरी केल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.