.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेची ऑफर करात मिळतेय सूट, पालिकेचा कर प्राप्तीचा फंडा आहे तरी काय? तुम्ही घेतलाय का लाभ? जाणून घ्या

नाशिक महानगर पालिकेच्या पहिल्या 11 दिवसात कोट्यवधी रुपयांचा कर जमा झाला आहे. महानगर पालिकेने सवलतीचा फंडा राबविल्याने 'हा' कर वसूल झाला आहे.

महापालिकेची ऑफर करात मिळतेय सूट, पालिकेचा कर प्राप्तीचा फंडा आहे तरी काय? तुम्ही घेतलाय का लाभ? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 12, 2023 | 9:00 AM
Share

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाच्या वतीने अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यातच संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी आणि घरपट्टी भरल्यास त्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये पहिल्या 11 दिवसांमध्ये पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. एकरकमी कर भरणाऱ्यांना महापालिकेच्या वतीने 01 एप्रिल पासून सूट देण्यात आली होती. महापालिका हद्दीतील मिळकत धारकांनी या सवलतीचा मोठा फायदा घेतला आहे. तब्बल 08 कोटी 33 लाख 17 हजार 555 इतकी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम पूर्व विभागातील असल्याचं समोर आलंय. कर रकमेत सवलत मिळत असल्याने ऑनलाइन भरणा करण्यावर चांगलाच भर दिला आहे.

खरंतर पालिकेचा कर बुडवणाऱ्यांच्या घरासमोर पालिकेला अक्षरशा ढोल बजाव आंदोलन करण्याची वेळ येत असते. अनेक मालमत्ता धारक हे पालिकेचा कर भरत नसल्याचं समोर आले आहे. यामध्ये लाखो रुपयांचा कर असलेले मालमत्ता धारकच अनेकदा दिसून आले आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जे मालमत्ता धारक कर भरत नाही त्यांना सुरुवातीला नोटीसा बजावतात. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या घरासमोर जाऊन तिथे ढोल बजाव मोहीम राबवत कर वसुली करत असतात.

जोपर्यंत संबंधित मालमत्ता धारक कर भरत नाही, तोपर्यंत ढोल वाजवण्याची मोहीम सुरूच असते. अनेकदा नागरिक आपल्या घरासमोर ढोल वाजू नये यासाठी आधीच रक्कम भरून टाकत असतो. मात्र, असे अनेक मालमत्ता धारक असतात की ते वर्षानुवर्ष कर भरत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण पडत असतो.

नाशिक महानगरपालिकेचा आर्थिक स्रोत हा मुख्यत्वे कर आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांकडून कर कशा पद्धतीने लवकरात लवकर वसूल करता येईल यासाठी पालिकेचा नेहमीच प्रयत्न असतो.

याच पार्श्वभूमीवर सुरुवातीलाच सवलत देऊन कोट्यवधी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सवलतीचा फंडा वापरला आहे. त्याला नाशिक मधून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नाशिकच्या पूर्व विभागातून यामध्ये सर्वाधिक कर जमा झाला आहे. पहिल्या अकरा दिवसांमध्येच पालिकेच्या तिजोरीत जवळपास साडेआठ कोटी रुपये जमा झाले आहे असून त्यामध्ये 1 कोटीहून अधिक रक्कम पूर्व विभागाची आहे.

पालिकेच्या तिजोरीत नवीन वर्षाच्या दरम्यान अक्षरशः खडकडाट निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेने थकीत कर दात्यांच्या घरासमोर जाऊन ढोल बजाव मोहीम राबवत कोट्यवधी रुपये वसूल केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला सवलत देऊन पालिकेने कोट्यवधी रुपये आपल्या तिजोरीत जमा केले आहे.

पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून इंडेक्स क्रमांक समाविष्ट करून ही रक्कम भरता येते. चालू वित्तीय वर्षाचे देय देण्यासाठी पालिकेने विशेष सवलत सुरू केली आहे. यामध्ये सातपूर, पश्चिम, पूर्व, पंचवटी, सिडको आणि नाशिक रोड अशा सहा विभागांमध्ये कर भरणा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर