AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची चिंता आणखी वाढली, जुलै अखेर पाण्याचे नियोजन करावे लागणार, काय आहे कारण?

एकीकडे भर उन्हाळ्यात पाऊस पडत असतांना दुसरीकडे मात्र पावसाळा 'त्या' कारणाने लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात असतांना पालिकेकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे.

पाण्याची चिंता आणखी वाढली, जुलै अखेर पाण्याचे नियोजन करावे लागणार, काय आहे कारण?
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 7:58 AM
Share

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून पाऊस उशिराने दाखल होईल अशी स्थिती असल्याने पाण्याच्या बाबत वेळोवेळी नियोजन केले जात आहे. याकरिता पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि त्यानंतर उशिरा पडणारा पाऊस बघता पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यासाठी शासणाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. मागील महिण्यात नाशिक महानगर पालिकेने राज्य शासनाला पाणी कपातीचा एक फॉरमॅट सादर केला होता. तोच फॉरमॅट संपूर्ण राज्यात लागू करता येईल का? याबाबत विचारही केला आहे. एप्रिल महिन्यापासून ही अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, अद्याप निर्णय झालेला नसतांना पुन्हा नियोजन बदलण्याची गरज निर्माण झाली असून नाशिक महानगर पालिकेच्या वतीने ऑगस्ट अखेर पर्यन्त पाणी नियोजन करण्याबाबत नियोजन सुरू आहे.

समुद्रात घोंगावत असलेल्या अल निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी पाऊस लांबणीवर पडेल असे तज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणी बचत करून पाणी वापरावे असे आवाहन पालिकेच्या वतीने केले जात आहे. त्याकरिता वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे.

तर दुसरीकडे पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावकडे पालिका आस लावून बसलेली असतांना पुन्हा ऑगस्ट पर्यन्त पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. एकीकडे उन्हाळ्यात पाऊस होत असल्याने ही संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती पालिकेसमोर उभी राहिली आहे.

नाशिक महानगर पालिकेन जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त 200 दशलक्ष घनफुट पाणी  आरक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत 6400 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षण शिल्लक आहे. मात्र पावसाळा लांबणीवर पडल्यास पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाची मदत मागितली आहे.

खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. धरणे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्याची उणीव भासत नाही. मात्र भविष्यातील संकट ओळखून दरवर्षी मार्च अखेर पालिकेच्या वतीने आढावा घेण्यास सुरुवात केली जाते. तर दुसरीकडे ग्रामीण भागात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांना आठवड्यातील एक दिवस पाणी कपात करण्याचा विचार सुरू आहे. जसा जसा महिना वाढत जाईल तसा आठवड्यातील एक दिवस अधिकची पाणी कपात केली जाईल असा तो प्रस्ताव आहे. शासनाच्या विचाराधीन तो प्रस्ताव असला तरी स्थानिक पातळीवर पाण्याची काटकसर कशी करता येईल याकरिता प्रयत्न पालिकेकडून केली जात आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.