VIDEO | नाशिक स्टेशनवर पाणी प्यायला उतरला, धावती ट्रेन पकडताना घसरला, पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण

अनिश बेंद्रे

|

Updated on: Apr 28, 2021 | 10:59 AM

प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यामध्ये अडकलेल्या प्रवाशाला इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके या दोघा पोलिसांनी वाचवले. (Nashik Running Train Police)

VIDEO | नाशिक स्टेशनवर पाणी प्यायला उतरला, धावती ट्रेन पकडताना घसरला, पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण
नाशिकमध्ये ट्रेन पकडताना पडलेल्या वृद्धाला पोलिसांनी वाचवलं

Follow us on

नाशिक : चालती ट्रेन पकडण्याच्या नादात पायरीवरुन घसरलेल्या वृद्धाचे प्राण पोलिसांनी वाचवले. प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यामधील पोकळीत अडकलेल्या प्रवाशाला दोघा पोलिसांनी वाचवले. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. (Nashik Old Man falls while catching Running Train saved by Railway Police)

गोदान एक्स्प्रेसमधून रियाज शेख हा वृद्ध प्रवासी नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्यासाठी उतरला होता. इतक्यात ट्रेन सुटल्याने त्याने धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेनने वेग धरल्यामुळे वृद्ध पायरीवरुन घसरला. मात्र लोहमार्ग पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवले.

रेल्वे पोलिसांनी वृद्धाला वाचवले

प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यामध्ये अडकलेल्या प्रवाशाला इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके या दोघा पोलिसांनी वाचवले. नाशिक रोड रेल्वे स्थानकातील ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रियाज शेख यांचा जीव वाचवणारे लोहमार्ग पोलीस इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वांगणी रेल्वे स्थानकातील घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये याची पुनरावृत्ती घडली आहे.

पाहा व्हिडीओ :

वांगणी स्टेशनवर मयुर शेळकेचं शौर्य

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या :

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

एकही दिल है, कितनी बार जितोगे? मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध महिलेला देणार

(Nashik Old Man falls while catching Running Train saved by Railway Police)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI