Nashik | नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या इंजिनला भीषण आग, संपूर्ण कार आगीत जळून खाक, सुदैवाने चालक बचावला

Nashik | नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या इंजिनला भीषण आग, संपूर्ण कार आगीत जळून खाक, सुदैवाने चालक बचावला
नाशिक-पुणे महामार्गावर इंजिनला लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली.
Image Credit source: tv9

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासवर एक कारच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सुदैवाने चालक कारमधून बाहेर पडल्याने बचावला आहे. घोरवड घाटात ही घटना घडली आहे.

उमेश पारीक

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 18, 2022 | 11:51 AM

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासवर कारच्या इंजिनला आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण कार (Car) जळून खाक झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत चालक कारमधून बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला आहे. घोरवड घाटात ही घटना घडली. यापूर्वी कारला आग लागून चालकाचाही (driver) होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नांदूरसिंगोटे बायपास परिसरात एका कारने पेट घेतल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कारच्या इंजिनमधील बिघाडामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाढतं तापमान यामुळे देखील आगीच्या घटना घडातायेत. मात्र, गाडीच्या इंजिनला आग लागल्याची घटना गंभीर आहे. कारण यापूर्वी देखील अशीच घटना नांदूरसिंगोटे बयपासवर घडल्यानं चिता व्यक्त केली जातेय. दरम्यान, यासारख्या घटना घडू नये, यासाठी चालकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. गाडीमध्ये आशा कोणत्याही प्रकारचा बिघाडीचा संशय आल्यास त्वरीत बाहेर उतरुन तपासणी करुनच गाडी चालवायला हवी.

यापूर्वी अशा घटना

नांदूरशिंगोटे बायपासवर एक कारच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत  सुदैवाने चालक कारमधून बाहेर पडल्याने बचावल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे अशी घटना यापूर्वी देखील घडली होती. नांदूरसिंगोटे बयपासवर ही घटना घडली होती. यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू  झाला होता.

इंजिनची तपासणी करा!

राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. त्यामुळे शक्यतो गाडी सावलीत उभी करा. इंजिन चेक करुन घ्या आणि ठरावीक वेळेनंतर गाडीची तपासणी करुन घ्या. यामुळे गाडीत कोणतीही बिघाडी असल्यास लवकर लक्षात येईल आणि होणारा अनर्थ टळेल. त्यामुळे या बाबींकडे लक्ष द्यायला हवं. नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासवर घडलेली घटना गंभीर आहे. सुदैवाने चालक बचावला. अशा घटना होऊ नये, यासाठी सतर्क राहणं गजेचं आहे.

गाडीत बसताना सतर्क व्हा!

नांदूरसिंगोटे बायपास परिसरात कारने पेट घेतल्यानं सतकर्ता बाळगायला हवी. यासारखी खटना पुन्हा होऊ नये, यासाठी गाड्यांची नियमित तपासणी, गाडीला सावलीत उभी करणे, गाडीत बिघाडीचा थोडाही संशय आल्यातस त्वरित गाडीला गॅरेजमध्ये दाखवून घेणे, अशी सतर्कता घेतल्यास धोका टळून शकतो. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासवर कारच्या इंजिनला आग लागलेल्या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी सतर्क व्हा.

इतर बातम्या

मुंबईत चहाप्रेमींच्या खिशाला कात्री, चहा, कॉफीमध्ये दरवाढ

Pune crime | पाहा Video : शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी

Guarantee Price Centre : बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना आधार खरेदी केंद्राचा, जनजागृतीनंतर आवक वाढली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें