Weather report : असानी चक्रीवादळाचा धोका वाढला!, राज्यात उष्णतेची लाट येणार?, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Weather report : असानी चक्रीवादळाचा धोका वाढला!, राज्यात उष्णतेची लाट येणार?, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
file photo
Image Credit source: google

बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असानी नावाच हे चक्रीवादळ असून दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ तयार झालं आहे. तर राज्यातही उष्णता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 18, 2022 | 11:05 AM

मुंबई : बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असानी नावाच हे चक्रीवादळ असून दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ तयार झालं आहे. यामुळे आज अंदमान-निकोबारसह (Andaman Nikobar)काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ ताशी 65 ते 75 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहण्याची शक्‍यता असल्याने समुद्र किनारपट्टीला हाय अलर्ट देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत एनडीआरएफसह (NDRF) तिन्ही लष्करी दलांना अलर्ट केलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त व्यक्त केली जातेय. राज्याची राजधानी मुंबईमध्ये प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. हा उकाडा सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होते. सध्या राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (heat wave) पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला तापमानाचा (tempreture) फटका बसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राला उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे.

राज्यातील तापमान वाढतेय

राज्यात सर्वाधिक किमान तापमान बुधवारी कुलाबा येथे नोंदवण्यात आलंय. पुढील पाच दिवस वातावरण असेच कोरडे असेल आणि किमान पुढील दोन दिवस तरी वातावरणात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाब्यामध्ये बुधवारी 33 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. तर दक्षिण आणि उत्तर कोकण भागात सर्वच ठिकाणी बुधवारी कमाल तापमानाचा पारा उतरला आहे. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राला उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे.

मार्चमध्ये चक्रीवादळाची दुर्मिळ घटना

हिंदी महासागरात मार्च महिन्यात चक्रीवादळ तयार होणं. ही अतिषय दुर्मीळ घटना मानलं जातंय. यापूर्वी 1891 ते 2020 या 130 वर्षांच्या कालावधीमध्ये 8 वेळा मार्चमध्ये चक्रीवादळांची नोंद झाली होती. त्यापैकी 6 वादळे बंगालच्या उपसागरात, तर 2 अरबी समुद्रात तयार झाली होती. मार्चमध्ये नोंदल्या गेलेल्या 8 चक्रीवादळांपैकी सहा चक्रीवादळांची तीव्रता समुद्रावरच कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

जोरदार पवसाची शक्यता

गुरुवारी आग्नेय बंगालच्या उपसागराच्या मध्य भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली होती. त्यामुळे पुढच्या तीन दिवसात या क्षेत्राची तीव्रता वाढू शकते. समुद्रावरुन उत्तरेकडे सरकताना या क्षेत्राचा प्रवास अंदमान निकोबार बेटांच्या जवळून होणार असल्यानं या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर 21 तारखेला हंगामातील पहिले चक्रीवादळ तयार होऊ शकते. हे चक्रीवादळ 22 मार्चला म्यानमार-बांगलादेशच्या किनारपट्टीजवळ पोहचणार आहे.

इतर बातम्या

भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर…; sanjay raut यांचा भाजपला इशारा

Chilly Cultivation : प्रक्रिया उद्योगामुळे मिरची उत्पादनात वाढ, भारतामधील मिरची मसाला सातासमुद्रा पार

Hinjewadiच्या सरपंचपदी शिवनाथ जांभुळकर यांची निवड, प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें