AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाशिककरांना मोठा दिलासा; कोणत्या योजनांसाठी किती कोटी?

नाशिक महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्मार्ट स्कूल, पर्यावरण, नमामी गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी हब विकसित करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.

Nashik | महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाशिककरांना मोठा दिलासा; कोणत्या योजनांसाठी किती कोटी?
Nashik Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 4:54 PM
Share

नाशिकः आगामी नाशिक महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर कुठलिही करवाढ न करता आज महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे नाशिकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2022-2023 या वर्षासाठी 2219.02 कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. दरम्यान, या सादर केलेल्या अंदाजपत्रकात कुठल्याही करामध्ये दरवाढ नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महसुली 50 कोटी आणि भांडवली 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोविडसाठी ३० कोटी, पर्यावरण विषयांसाठी 25 कोटी, नाशिकमधील प्रत्येक प्रभागात स्मार्ट स्कूल उभारण्यासाठी 15 कोटींची तरतूद, बिटको कॉलेजमध्ये मेडिकलचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 15 कोटी, आयटी हबसाठी 10 कोटी, निवडणुकीसाठी चालू वर्षी 10 कोटी आणि पुढील वर्षी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

स्मारकांसाठी तरतूद

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. तसेच नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची करवाढ न करता दिलासा देण्यात आल्याने आगामी मनपा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला याचा किती फायदा होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महापुरुषांची स्मारके उभारणीसाठी नाशिक महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतूद केली आहे. यामध्ये मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारणार, बिडी भालेकर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा बसविणार, पंचवटी येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी तरतूद केली आहे.

विकासावर भर

शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पूर्तता करताना समतोल विकासाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण, नमामी गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी हब विकसित करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर चर्चा न घेताच मंजूर करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.