थापड्याने गुंतवणूकदारांना घातला 64 लाखांचा गंडा; नाशिकमध्ये 13 जणांची फसवणूक

नाशिकमध्ये (Nashik) एका थापड्याने 13 जणांना 64 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थापड्याने गुंतवणूकदारांना घातला 64 लाखांचा गंडा; नाशिकमध्ये 13 जणांची फसवणूक
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 4:37 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) एका थापड्याने 13 जणांना 64 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (13 people cheated in Nashik, Rs 64 lakh embezzled)

याविषयी सविस्तर माहिती अशी की, राहुल शंकर गौडा (वय 35, रा. बेळगाव, कर्नाटक) हा आपण अॅक्युमेन आणि गुडवेल या शेअर मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे सगळ्यांना सांगत असे. लोकांचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने वैद्यनगर भागातल्या सोसायटीत आपले कार्यालय थाटले होते. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला तो गुंतवणुकीचे आमिष दाखवायचा. लोकांचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून तो अॅक्युमेन आणि गुडविल कंपनीचे आपण शेअर ब्रोकर असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवायचा. समोरच्याला विश्वासात घेत आपले म्हणणे पटवून द्यायचे कसब त्याच्याकडे होते. याच जोरावर त्याने 1 नोव्हेंबर 2020 ते 5 एप्रिल 2021 या काळात गुंतवणूकदारांचा विश्वास संपाद केला. एकूण 75 लाख 45 हजारांची रक्कम त्यांच्याकडून स्वीकारली. लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यातल्या 11 लाख 1597 रुपयांचा त्याने गुंतवणूकदारांना परतावा दिला. मात्र, त्यानंतर त्याने इतरांना पैसे द्यायला टाळाटाळ केली. शेवटी कंटाळून भगूर इथल्या देवळाली कॅम्पचे संजय सदानंद बिन्नर यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिन्नर यांच्यासह त्याने जवळपास 13 जणांना फसवल्याचे समजते. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत आहिरे करत आहेत.

आकडा वाढण्याची शक्यता राहुल शंकर गौडाच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याने अजून किती जणांना गंडा घातला आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोणावरही विश्वास ठेवून गुंतवणूक करत जाऊ नका. योग्य माहिती घेऊन आणि विशेषतः सरकारी बँकांच्या योजना, पोस्ट खाते किंवा प्रतिष्ठित खासगी बँकांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

ज्वेलर्समध्ये चोरी

नाशिकमधील सराफा दुकानातून भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली होती. सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि विभांडक यांनी दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. (13 people cheated in Nashik, Rs 64 lakh embezzled)

इतर बातम्याः

3 हजार हेक्टवरील पीक उद्धवस्त; नाशिकमधल्या 4816 शेतकऱ्यांचे नुकसान

कथित धर्मांतरण प्रकरणः नाशिकचा कुणाल उच्चशिक्षित, रशियात एम. डी. मेडिसीन केले पूर्ण; वडील होते लष्करी सेवेत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.