नाशिकमध्ये 400 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, पालकमंत्री भुजबळ यांची माहिती; 29 ठिकाणी प्लांट उभारणार

तिसऱ्या कोरोना (corona) लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये ३५० मेट्रिक टनची व्यवस्था केली असून, ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आपण निर्मिती करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी (23 सप्टेंबर) पालकमंत्री छगन भुजबळ (Bhujbal) यांनी दिली.

नाशिकमध्ये 400 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, पालकमंत्री भुजबळ यांची माहिती; 29 ठिकाणी प्लांट उभारणार
नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 4:40 PM

नाशिकः तिसऱ्या कोरोना (corona) लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये ३५० मेट्रिक टनची व्यवस्था केली असून, ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आपण निर्मिती करणार आहोत, अशी माहिती गुरुवारी (23 सप्टेंबर) पालकमंत्री छगन भुजबळ (Bhujbal) यांनी दिली. त्यांच्या हस्ते घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. (400 metric tons of oxygen will be produced in Nashik, informed Guardian Minister Bhujbal)

उद्घाटनावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच अलका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडखे, संदीप गुळवे, बाळासाहेब गाढवे, आरोग्य उपसंचालक पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, डॉ. संजय सदावर्ते आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर ठरली. यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या परिस्थितीत शासन- प्रशासनाने ऑक्सिजनचे यशस्वी नियोजन केले. एरव्ही जिल्ह्यात 80 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून नाशिक जिल्ह्यात सर्व रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 29 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात डॉक्टर परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले मोलाचे योगदान दिल्याचे ते म्हणाले.

दहापेक्षा अधिक प्लांट सुरू

भुजबळ म्हणाले की, साथरोगांच्या काळासह इतर काळातही रुग्णालयात नियमित ऑक्सिजन मिळणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक प्लांट सुरू करण्यात आले असून, इतर प्लांटही लवकरच सुरू करण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सर्व उपाययोजना करत आहे. त्यात नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

नाशिक-मुंबई रस्त्यांसाठी गडकरींना पत्र

नाशिक – मुंबई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. या नाशिक- मुंबई रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून रस्त्याच्या मजबुतीकरण करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली असून, १५ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत शासन मार्गक्रमण करत विकासाची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले.

घोटीचे उपजिल्हा रुग्णालय करा

आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या अडचणींचा सामना करत आहोत. याबाबत शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्मिती करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगत घोटी येथील रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. (400 metric tons of oxygen will be produced in Nashik, informed Guardian Minister Bhujbal)

इतर बातम्याः

निवडणुकीआधी राज ठाकरेंचा षटकार; नाशिक मनसेमध्ये मोठे फेरबदल!

नाशिकः शेतकऱ्यांची लूट करायची इरसाल पद्धत; पठ्ठ्यांनी बाजार समितीच्या वजन काट्यालाच बांधला दगड

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.