Malegaon | मालेगावातील सटाणा येथे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, चोरटे CCTV मध्ये कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

| Updated on: Jul 06, 2022 | 11:45 AM

दरम्यान सटाणा शहरात मोठ्या प्रमाणावर धाडशी चोऱ्या घरफोडीच्या घटना वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचे गुन्हेगारी घटना रोखण्यात अपयश दिसून येत आहे. या अगोदरही गेल्या महिन्यात दोन शासकीय कार्यालय व एक घर फोडून धाडसी चो-या झाल्या आहेत.

Malegaon | मालेगावातील सटाणा येथे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, चोरटे CCTV मध्ये कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
Image Credit source: tv9
Follow us on

मालेगाव : सटाणा शहरात चोरी (Theft) आणि घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणांहून टू व्हीलर चोरी वाढलीयं. घरफोडी आणि टू व्हीलरच्या (Two wheeler) घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी मोठा धसका घेतला असून पोलिसांनी अधिक लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटना बघता चोरांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. दिवसाढवळ्या चोर बिनधास्तपणे चोरी करत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) दिसते आहे.

हॉस्पिटल समोरून भरदिवसा टू व्हीलर चोरीला

सटाणा शहरातील एका हॉस्पिटल समोरून भरदिवसा टू व्हीलर चोरीला गेल्याने गेल्याने वाहन मालकाने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. चोर टू व्हीलर चोरताना स्पष्ट सीसीटीव्हीमध्ये दिसतो आहे. मात्र, असे असूनही अघ्यापही चोराला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. यामुळे शहरात पोलिस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शहरातील चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश

दरम्यान सटाणा शहरात मोठ्या प्रमाणावर धाडशी चोऱ्या घरफोडीच्या घटना वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचे गुन्हेगारी घटना रोखण्यात अपयश दिसून येत आहे. या अगोदरही गेल्या महिन्यात दोन शासकीय कार्यालय व एक घर फोडून धाडसी चो-या झाल्या आहेत. आता पुन्हा टू व्हीलर चोरट्यांनी डोके व काढल्याने पोलिसांनी आता रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त लवकर करावा, अशा मागणी नागरिक करत आहेत.