राज्यपालांचे माझ्यावर देखील प्रेम, पण…भुजबळांनी भर कार्यक्रमात काय केली तक्रार?

कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ला दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, आम्ही कायम कामगारांच्या सोबत होतो. मात्र, हल्ला करणे ही आपली संस्कृती नाही. असे प्रकार इथेच थांबायला पाहिजेत.

राज्यपालांचे माझ्यावर देखील प्रेम, पण...भुजबळांनी भर कार्यक्रमात काय केली तक्रार?
छगन भुजबळ आणि भगतसिंह कोश्यारी.
चंदन पुजाधिकारी

| Edited By: मनोज कुलकर्णी

Apr 09, 2022 | 2:56 PM

नाशिकः राज्यपालांचे माझ्यावर देखील प्रेम आहे, पण राजकारणात ते माझे ऐकत नाही, अशी तक्रार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आणि एकच खसखस पिकली. राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या सुवर्ण महोत्सवाचा समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) होते. भुजबळ म्हणाले की, राज्यपालांचे नाशिकवर प्रेम आहे. नाशिकच्या कार्यक्रमाला बोलावलं की, ते नक्की येतात. माझ्यावर देखील त्यांचं प्रेम आहे, पण राजकारणात ते माझं ऐकत नाहीत. राजकारण एकीकडे, मैत्री एकीकडे. मात्र, राज्यपाल आले म्हणजे महाराष्ट्र सरकारच आलं असं मी मानतो. खरं तर नाशिकचं चांगलं क्लायमेट बघून प्रभू श्री रामचंद्र पूर्ण परिवारासह इथं राहिले. माझं तुम्हालाही निमंत्रण आहे. तुम्ही देखील इथे या, असे आवाहन त्यांनी केले.

अन् राज्यपालांनी मास्क काढला….

भुजबळ म्हणाले की, मध्यंतरी कोरोना आला. आपण साऱ्यांनी तोंडाला पट्ट्या लावल्या, पण त्यामुळे कोणाचे पैसे द्यायचे असतील, तर पळून जाता येत होतं. मास्कमुळे कोण आलं, कोण गेलं कोण भेटलं कळतच नाही. राज्यपालांनी मास्क घातलाय, असे म्हणतात कोश्यारी यांनी तात्काळ मास्क काढला. यावेळी भुजबळांनी पश्चिम महाराष्ट्राची नाही, तर उत्तर महाराष्ट्राची देखील प्रगती झाली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली.

तो हल्ला दुर्दैवी

कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ला दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, आम्ही कायम कामगारांच्या सोबत होतो. मात्र, हल्ला करणे ही आपली संस्कृती नाही. असे प्रकार इथेच थांबायला पाहिजेत. दोन दिवस आधी गुलाल उधळला, आनंदोत्सव साजरा केला. मग काल अचानक काय झाले. हा हल्ला पूर्वनियोजित होता. दगड आले कुठून, पोलीस दल कमी पडले, जिथे दगड नाही तिथे चपला मारल्या. हल्ल्यात हात कोणाचेही असो, पण डोकं कोणाचं हे शोधलं पाहिजे. पोलिस आणि त्यांचा गुप्तवार् सारख्या यंत्रणांनी यापुढे अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें