राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी; नाथाभाऊ जळगावात भाजपला अस्मान दाखवणार?

गेल्या वर्षी भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (eknath khadse)

राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी; नाथाभाऊ जळगावात भाजपला अस्मान दाखवणार?
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव: गेल्या वर्षी भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या आढावा बैठकीला थेट भाजपच्या नगराध्यक्षाने सहकाऱ्यांसह हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bjp’s big leader on ncps stage in jalgaon)

सावदा येथील पालिकेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यात आज मनोमिलन घडून आले. निमित्त होते राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीचे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे सत्ताधारी नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी तसेच विरोधक हे एकत्र आले होते. यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणाची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा फटका भाजपला बसणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजेश वानखेडे आणि पंकज येवले व त्यांचे सहकारी यांच्यात मनोमिलन व पक्षप्रवेश घडवून आणणे यासाठीच ही आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सावदामध्ये भाजपची सत्ता आहे. परंतु भाजपचे नगराध्यक्ष हे खडसेचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपला सावदामध्ये शह देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

खडसेंवर उपचार

दरम्यान, खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती. (bjp’s big leader on ncps stage in jalgaon)

 

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे

VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

(bjp’s big leader on ncps stage in jalgaon)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI