बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

बारावी पुरवणी परीक्षेच्या (examination) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत

बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
एमएचटी सीईटी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

नाशिकः बारावी पुरवणी परीक्षेच्या (examination) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकामध्ये अरेबिक (arabic) विषयाची पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. (Changes in the schedule of the 12th Supplementary Examination)

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार त्यानुसार 12 वीच्या अरेबिक (36) या विषयाची पुरवणी परीक्षा मंगळवारी ( 21 सप्टेंबर 2021) दु. 3 ते 6 या वेळेत घेण्यात येणार होती. मात्र, आता ही परीक्षा परीक्षा 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे. इयत्ता 12 वी लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. वेळापत्रकातील बदलाची माहिती सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. दरम्यान, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या काळात होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 08 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान होणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षा 21 सप्टेंबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे. या परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनासाठी कार्यान्वित असलेले शासकीय अधिकारी ,कर्मचारी आणि शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळेपत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आऊट ऑफ टर्न, प्रात्याक्षिक परीक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

येथे साधावा संपर्क
परीक्षा काळात नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी-अडचणींची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हेल्पलाइनचा उपयोग करता येईल. परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडी अडचणींचे निरसन करण्यासाठी सर्व संबंधितांनी 0253-2950410 या हेल्पलाइनवर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Changes in the schedule of the 12th Supplementary Examination)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI