Chhagan Bhujbal: छगन भुजबळ दौरा सोडून तातडीने हॉस्पिटलमध्ये, कार्यकर्त्यांची धावपळ, घडलं काय?

Chhagan Bhujbal Health Update : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात आले. त्यांचे नाशिकचे सगळे कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने भुजबळ उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ दौरा सोडून तातडीने हॉस्पिटलमध्ये, कार्यकर्त्यांची धावपळ, घडलं काय?
छगन भुजबळ रुग्णालयात
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 20, 2026 | 1:10 PM

Chhagan Bhujbal Health Update: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन करण्यात आले. त्यांचे नाशिकचे सगळे कार्यक्रम रद्द करून भुजबळ मुंबईत उपचारासाठी रवाना झाले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. यापूर्वी भुजबळांवर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

गेल्यावर्षी हृदय शस्त्रक्रिया

राज्याच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत आहेत. त्यांच्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस हृदय शस्त्रक्रिया झाली होती. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते अनेक दिवस सामाजिक आणि राजकीय मंचापासून दूर होते. तर डॉक्टरांच्या परवानगीने एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुध्दा त्यांच्या भेटीला त्यावेळी रुग्णालयात गेले होते.

तर दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये छगन भुजबळ हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी आणि उपचारानंतर ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले होते. एक अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी ओबीसी चळवळीच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातही मोठे काम केले. ओबीसी नेते म्हणून त्यांनी अनेकदा मोठी भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरत लढा दिला. त्यांनी अनेकदा जहाल शब्दात काही घडामोडींवर प्रखर भाष्य केले आहे.

रोहित पवारांच्या भूमिकेवर तिरकस बाण

रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जे वक्तव्य केले. त्यांच्यावर कालच छगन भुजबळ यांनी टीका केली. विलिनीकरणानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असा दावा रोहित पवारांनी केला होता. त्या वक्तव्याचा समाचार भुजबळांनी घेतला. आम्हाला विलिनीकरणाविषयी काहीही माहिती नाही आणि अजितदादा सुद्धा याविषयी काही बोलले नाही असा दावा भुजबळांनी केला.विलिनीकरणाअगोदरच रोहित पवारांनी बहतांशी निर्णय आणि पदांचे वाटप केले की काय असा टोलाही भुजबळांनी रोहित पवारांना लगावला.