AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला गती; लॉकडाऊन नको, सतर्क राहा : छगन भुजबळ

जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तत्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहीम गतीमान करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला गती; लॉकडाऊन नको, सतर्क राहा : छगन भुजबळ
CHHAGAN BHUJBAL
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 7:35 PM
Share

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तत्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम गतीमान करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी जनतेला काळी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येऊ देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कोरोना नियम न पाळल्यास पुन्हा परिस्थिती गंभीर 

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात मालेगाव येथून कोरोना विषयक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना “नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, सॅनिटाईजर, व सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगिकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होऊ शकते,” असा इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोविड चाचणी बंधनकारक करावी

तसेच पुढे बोलताना “कॉन्टॅक्ट टेसिंगमध्ये एखादी आस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी. अन्यथा रुग्णास नजिकच्या सीसीसी (CCC) केंद्रात दाखल करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावी,” असे निर्देश छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.

अमृतमहोत्सवाच्या औचित्याने सलग 75 तास लसीकरणाची मोहीम घ्यावी:  दादाजी भुसे

जिल्ह्यात आजपासून कवच-कुंडल मोहीम सुरू झाली असून या मोहिमेत लोकसहभाग वाढविण्यासाठी काही नावन्यपूर्ण मोहिमांची जाणीवपूर्वक आखणी करण्यात यावी. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. त्याचे औचित्य साधून सलग 75 तास लसीकरणाची मोहीम प्रायोगिक तत्वावर मालेगावमध्ये राबविण्यात यावी. त्याचबरोबर मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात मंजूर ऑक्सिजन प्लांट तत्काळ कार्यान्वित करण्यात यावा. मालेगाव सामान्य रूग्णालयात आसपासच्या तालुक्यांतील रूग्णही येत असतात. त्यामुळे सध्याच्या जागेचे विस्तारीकरण करण्यासाठी एक मजला वाढविण्याचा 15 कोटी रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यास मंजुरीसाठी आरोग्य प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी  सूचना यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केली.

इतर बातम्या :

पती डॉक्टर, दोन मुली, ITच्या रडारवर अजित पवार यांची बहीण, विजया पाटील नेमकं काय करतात ? जाणून घ्या सर्व काही

पाकिस्तानला दे धक्का ! भारतीय रताउल आंब्यालाच ‘जीआय टॅग’ प्रदान

ज्या जेलमध्ये कसाबला ठेवलं, संजय दत्त राहीला, तिथंच आता आर्यन खानची रवानगी, कशी आहे आर्थर रोड जेल?

(chhagan bhujbal ordered to incrase corona vaccination contact tracing in nashik district)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.