Crime News : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात पीएफआय संघटनेचा हात ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने १७ तारखेपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Crime News :  पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात पीएफआय संघटनेचा हात ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 2:16 PM

नाशिक : राज्याच्या एटीएस (ATS) पथकाने 22 सप्टेंबरला पहाटे पीएफआयशी (PFI) संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांना छापेमारी करत अटक केली होती. राष्ट्रीय केंद्रीय यंत्रणा आणि ईडीच्या (ED) देशानुसार ही कारवाई संपूर्ण देशभरात करण्यात आली होती. त्यात नाशिकच्या मालेगावसह पुणे, बीड आणि कोल्हापूर येथील पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यात त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी 3 ऑक्टोबरपर्यन्त त्यांना एटीएसची कोठडी देण्यात आली होती. त्यानुसार तपासा दरम्यान मोठे पुरावे हाती लागले असून धक्कादायक बाब म्हणजे न्यायालयात एटीएसने पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बब्लास्ट प्रकरणात पीएफआयचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी विश्वास खळबळ उडाली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने १७ तारखेपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

देशविरोधी कारवायामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आणि समाजात अशांतता पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप पीएफआय वर आहे.

मालेगाव मधून अटक करण्यात आलेल्या पीएफआयचा पदाधिकारी मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी याने बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

हैदराबाद आणि पुण्यातील बहुचर्चित जर्मन बेकरी स्फोट या दुहेरी बॉम्ब स्फोटाशी पीएफआयचा सहभाग असल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती समोर येत आहे.

मालेगावातून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी, पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान, बीडमधून वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख, कोल्हापुरातून मौला नसीसाब मुल्ला यांना एटीएसने अटक केली होती.

या अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यात मोठ्या रक्कमांचा व्यवहार दिसून येत असून आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.