AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुबेराचं धन महाग…नाशिकमध्ये सोन्याला झळाळी!

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत बुधवारी (22 सप्टेंबर) सोने (gold) महाग झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये नोंदवले गेले.

कुबेराचं धन महाग...नाशिकमध्ये सोन्याला झळाळी!
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 22, 2021 | 2:14 PM
Share

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत बुधवारी (22 सप्टेंबर) सोने (gold) महाग झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,900 per 10 grams)

सोने म्हटल की गुंतवणूकदारांसाठी एखाद्या पर्वणीसारखे असते. त्याचा परतावा खणखणीत वाजवून मिळतो. त्यामुळे बहुतांश जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी हेच दर 46700 रुपये होते. त्यात जवळपास 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर बुधवारी 10 ग्रॅममागे 45500 रुपये होते. मंगळवारी हेच दर 44200 रुपये होते. या दरात जवळपास 1300 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. बुधवारी चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये होते. मंगळवारी हेच दर 63600 होते. या दरात जवळपास 2400 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

भाव अजून वाढणार पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

जोखीम पत्करण्याची गरज नाही

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजार पेठेत बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46900 रुपये होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 45500 होते. चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये होते. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,900 per 10 grams)

इतर बातम्याः 

नाशिकः गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी एकपासून पाण्याचा 6000 क्युसेक्स विसर्ग सुरू

सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी

नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...