धड धड वाढली, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या पुढे; सिन्नर गेले 296 वर

| Updated on: Sep 25, 2021 | 5:01 PM

एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे गेलीय. त्यामुळे चिंता वाढली आहे.

धड धड वाढली, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या पुढे; सिन्नर गेले 296 वर
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे गेलीय. त्यामुळे चिंता वाढली आहे. सध्या 1 हजार 54 रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत 8 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Increase in Corona patients in Nashik, treatment on 1 thousand 54 patients started)

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने सापडत आहेत. विशेषतः सिन्नर आणि निफाड रुग्ण सापडण्यात आघाडीवर आहेत. सिन्नरमध्ये सध्या 296 रुग्णांवर, तर निफाडमध्ये 187 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीणच्या इतर भागामध्ये नाशिक 29, बागलाण 17, चांदवड 42, देवळा 32, दिंडोरी 27, इगतपुरी 7, कळवण 5, मालेगाव 9, नांदगाव 6, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 11, येवला 84 अशा एकूण 754 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात 275, मालेगाव महापालिका क्षेत्रात 15 तर जिल्ह्याबाहेरील 10 रुग्ण असून, अशा एकूण 1 हजार 54 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 7 हजार 890 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.63

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.89 टक्के, नाशिक शहरात 98.15 टक्के, मालेगावमध्ये 97.06 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.63 इतके आहे. आजपर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 159, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 979, मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शंभर टक्के शिक्षकांचे लसीकरण नाही

राज्य सरकारने एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील 20 टक्के शिक्षकांनी अजूनही कोरोना लस घेतलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना 5 सप्टेंबरपर्यंत लस घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक शिक्षकांनी लस घेतली नसल्याचे समजते. अनेकांनी लसीबाबतच्या गैरसमजातून लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. काही जणांनी काहीही कारण नसताना चालढकलपणा केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे किती शिक्षकांनी लस घेतली याची निश्चित आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा सवाल आता पालक वर्गामधून होत आहे.

नियमांचे पालन नाही

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांकडे पाठ फिरवली आहे. जुन्या नाशिकमधील पंचवटी, रामकुंड परिसरात बाजार असो, की इतर ठिकाणी लोक गर्दी करत आहेत. शालिमार, अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह संपूर्ण शहरातही हीच परिस्थिती आहे. विशेषतः अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे.

जिल्ह्यातील 4 लाख 7 हजार 890 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3 लाख 98 हजार 215 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 54 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.च
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी (Increase in Corona patients in Nashik, treatment on 1 thousand 54 patients started)

इतर बातम्याः

अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!

गोल्डन चान्सः भाव वाढतील बरं, करा खरेदी पटापट; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव