दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, आरडाओरड केल्यानंतर…, वनविभागाचे पथक घटनास्थळी

उसाच्या शेतीमुळं बिबट्याला राहणं सोप्प झालंय. शेतात बिबट्यांची संख्या सुध्दा अधिक झाली आहे. ज्या शेतात बिबट्या हल्ला करीत आहे. तिथल्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत.

दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, आरडाओरड केल्यानंतर..., वनविभागाचे पथक घटनास्थळी
leopardImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 10:20 AM

मनोहर शेवाळे, मालेगाव : शेतात लपून बसलेल्या बिबट्याने (Leopard attack on Farmer) शेतकऱ्यावर हल्ला करीत त्याला जखमी केल्याची घटना नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथे सकाळच्या सुमारास घडली आहे. भगवंत गोविंद चौधरी अस शेतकऱ्याचं नाव असून सकाळी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले असता, दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांच्या जबड्याला, पाठीला, हाताला मोठ्या जखमा (Farmer injured) झाल्या असून त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरीक धावत आले आणि त्यांनी बिबट्याला पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

शेतातून पळत बिबट्याने सर्वाना गुंगारा दिला. दरम्यान जखमी शेतक-यावर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून गामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. अचानक हल्ला झाल्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. गंभीर जखमा झाल्याने शेतकऱ्यावरती उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात बिबट्याच्या रोज बातम्या कानावर येतात. कधी बिबट्या शेतात दिसला, कधी शेतकऱ्याच्या अंगावर आला, तर कधी हल्ला केला. उसाच्या शेतीमुळं बिबट्याला राहणं सोप्प झालंय. शेतात बिबट्यांची संख्या सुध्दा अधिक झाली आहे. ज्या शेतात बिबट्या हल्ला करीत आहे. तिथल्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याचबरोबर बिबट्याला जेरबंद सुध्दा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ज्या जिल्ह्यात जंगल अधिक आहे, तिथं असे हिंसक प्राणी पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी बुलढाण्यात शेतात अस्वल आढळून आलं होतं. अस्वल दिसत असल्यामुळे लोकं भयभीत झाली होती. वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आलं.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.