Video : मशिद, मंदिर, भोंगे, चालिसा सगळे विषय दुष्काळासमोर दुय्यम! नाशिकमधलं धगधगतं वास्तव हेच सांगतंय

Maharashtra Drought Nashik News : नेमकं हे गाव कोणतं आहे, याची माहिती मात्र एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली नाही.

Video : मशिद, मंदिर, भोंगे, चालिसा सगळे विषय दुष्काळासमोर दुय्यम! नाशिकमधलं धगधगतं वास्तव हेच सांगतंय
धगधगतं वास्तव
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jun 05, 2022 | 12:50 PM

नाशिक : आटत चाललेल्या विहिरी, तळ गाठलेले बंधारे आणि पाण्याअभावी (Maharashtra Water issue) करावी लागणारी मैलोनमैल फरफट, हे चित्रपटातलं दृश्य नसून उत्तर महाराष्ट्रातलं धगधगतं वास्तव आहे. तीन किलोमीटर लांब दररोज नाशिकच्या एका गावातील (Nashik Village drought) लोकांना पाण्यासाठी प्रवास करावा लागतोय. त्यानंतरही पाण्यासाठीचा संघर्ष मिटत नाही. एका माणसाला जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावं लागतं. तळ गाठलेल्या विहिरीतील चिखलाचं पाणी पाण्यात भरावं लागतं. वर उभ्या असलेल्या महिला हेच चिखलानं भरलेल्या पाणी वर ओढतात. ही नामुष्की मुंबई, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील गावावर ओढावलेली आहे. हे एक प्राथमिक चित्र असलं, तरी अनेक भागात दुष्काळ (Maharashtra Drought news) गडद होतोय, याकडे कुणाचंच लक्ष नसल्याचं अधोरेखित करणारी ही घटना आहे.

ANI वृत्त संस्थेनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता अधोरेखित झाली आहे. पाण्यासाठी वणवण फिरक महिला तीन किलोमीटर लांब चालत येतात. त्यानंतर एक इसम विहिरीत उतरतो. तळ गाठलेल्या विहिरीच्या चिखलातून पाणी वेचतो आणि एका भांड्यात भरतो.

व्हिडीओही समोर

चिखल सदृष्य पाण्याचे भरलेलं भांडं महिला विहिरीतून वर ओढतात. हा जवळपास नित्यक्रम झाल्यासारखं आहे. या पाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट लोकांना करावी लागतेय. हे भीषण वास्तव नाशिकमध्ये एका गावातलं आहे. नेमकं हे गाव कोणतं आहे, याची माहिती मात्र एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली नाही.

टॉवेलने पाणी गाळून घेण्याची नामुष्की

नाशिमधील काही ग्रामस्थांवर विहिरीतून काढलेला गढूळ पाणी हे टॉवेलनं गाळून घेण्याची नामुष्की ओढावली आहे. अनेक महिला या पाण्यासाठी भटकत असल्याचं या व्हिडीओतून अधोरेखित झालंय. 3 किलोमीटरची पायपीट करत पाण्यासाठी विहिरीपर्यंत यायचं. त्यानंतरही शुद्ध पाणी सोडाच, पण पुरेस पाणी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही. मिळेल तेवढं पाणी हंडा कळशी भरायचं आणि पुन्हा हे पाण्याचं ओझं घेऊन घराकडे परतायचं, अशी भयाण स्थिती सध्या नाशिक जिल्ह्यांतील गावांमध्ये पाहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

Video : पाण्यासाठी वणवण

मान्सून यंदा लवकर येईल अशी अपेक्षा होती. मान्सून वेळेआधी भारतात आला असला तरी त्यांचा महाराष्ट्रापर्यंत येण्याचा प्रवास मात्र लांबला. त्यामुळे अनेकांना फटका बसतोय. महाराष्ट्रातील फक्त नाशिकच नव्हे, तर बहुतांश दुष्काळी भागाला आता पाण्याचा प्रश्न भेडसावू लागलाय. राज्यसभा निवडणूक, भोंग्यांचं आंदोलन, हनुमान चालिसा, मंदिर, मशिद या सगळ्या चालू घडामोडींमध्ये दुष्काळी महाराष्ट्राकडे सरकारचं दुर्लक्ष तर होत नाहीये ना? असा सवालही आता उपस्थि केला जातोय.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें