नाशिक जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल, 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती

नाशिक जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Oxygen Generation Plant at Nashik)

नाशिक जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल, 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती
फोटो प्रातिनिधिक
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 2:31 PM

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला 37 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Minister Chhagan Bhujbal Inauguration of Oxygen Generation Plant at Nashik District General Hospital)

छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता वाढली

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता 10 केएलने वाढणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची अंतर्गत ऑक्सिजनची क्षमता 20 केएलची होती. पण आज निर्माण करण्यात आलेल्या या नव्या प्लांटमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता 30 केएल झाली आहे. त्यामुळे निर्माण करण्यात आलेल्या या प्लांटमुळे नव्याने वाढविण्यात आलेल्या दीडशे बेडला पुरक व्यवस्था म्हणून या प्लांटचा उपयोग होणार आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मिती करणारा मोठा प्रकल्प प्रस्तावित

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची दिवसाला 225 जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असणार आहे. तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात  निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता दिवसाला 125 सिलिंडरची आहे.

त्याशिवाय ग्रामीण रुग्णालयांमध्ये 60 ते 70 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती दिवसाला होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये उद्योग विभागाकडून 70 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे, असेही ते म्हणाले.

जून अखेरपर्यंत कार्यान्वित होणार 

नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होण्यासाठी शासकीय आणि महापलिका रुग्णालयात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 24, केंद्र सरकारच्यावतीने 04, एचएएल आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएसआर फंडातून 04 प्लांट, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून 06 तर मालेगांव महानगरपालिकेच्या एसडीआरएफ निधीतून 2 असे एकूण 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. हे सर्व ऑक्सिजन जनरेशन प्लांट जून अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे.

या ठिकाणी होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड ,ग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगांव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या 24 ठिकाणी हे ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण केले जाणार आहे.

तसेच केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या 4 ठिकाणी तर प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर ,गिरणारे, डांगसौंदाण येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहे. (Minister Chhagan Bhujbal Inauguration of Oxygen Generation Plant at Nashik District General Hospital)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची: छगन भुजबळ

‘महाविकासआघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले’

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.