नांदगावचे आमदार सुहास कांदे नाराज? नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद

नाशिक जिल्ह्याचा शिंदे गटाचा बॉस कोण हे अद्याप मला कळलेलं नाही, असं कांदे म्हणाले.

नांदगावचे आमदार सुहास कांदे नाराज? नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद
नांदगावचे आमदार सुहास कांदे नाराजImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 9:40 PM

नाशिक : आमदार सुहास कांदे नाराज आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय. नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्यात एकमत नसल्याचं समोर आलंय. कांदे यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं तक्रार केली. आधी बच्चू कडू नाराज झाले. मग, संजय शिरसाट यांच्या नाराजीची चर्चा झाली. आता नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची नाराजी समोर आली आहे. मालेगावचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांना बोलावलं जात नाही. इतरांना विश्वासात न घेता जिल्ह्यात पदाधिकारी नेमण्यात आले. नियुक्त पदाधिकारी पक्ष विस्तारासाठी अकार्यक्षम आहेत, अशी अनेक कारण आमदार सुहास कांदे यांनी दिली आहेत.

महत्त्वाच्या बैठकांना बोलविलं जात नाही. त्यामुळं नाशिक जिल्ह्याचा शिंदे गटाचा बॉस कोण हे अद्याप मला कळलेलं नाही, असं कांदे म्हणाले.

दुसरीकडं सुहास कांदे म्हणाले, मी सुरुवातीपासून सांगितलं की, मला दुसरी कोणतही जबाबदारी देऊ नका. मला नांदगाव विधानसभा क्षेत्रावर लक्ष ठेऊ द्या. या भागाचा विकास करायचा आहे. त्यासाठी वेळ द्यायचा आहे.

पालकमंत्री दादा भुसे हे नेते आहेत. त्यामुळं त्यांचा आदेश हा माझ्यासाठी मान्य राहील. त्यांच्या ओएसडीकडून किंवा पीआरओकडून मला डावलण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं सुहास कांदे हे कन्फुज असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आलं. सुहास कांदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळं पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून हा वाद असल्याचं समोर आलंय.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.