Nashik : नाशिककरांनो आज पाणी जपून वापरा! नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद

Nashik : नाशिककरांनो आज पाणी जपून वापरा! नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद
नाशिकमध्ये पाणीबाणी
Image Credit source: TV9 Marathi

Nashik water Cut News : नाशिक शहरात महावितरणकडून ओव्हरहेड लाईनसह सबस्टेशनचं पावसाळ्याआधीचं काम करण्यात येणार आहे.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: सिद्धेश सावंत

May 21, 2022 | 6:36 AM

नाशिक : नाशिक शहरात आज (21 मे) आणि उद्या पाणीबाणीचा (Water shortage) सामना करावा लागणार आहे. नाशिक महापालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे. नाशिक शहरात (Nashik City) 21 मे आणि 22 मे पाणी पुरवठ्यात कपात होणार आहे. आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून 22 मे रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाण्याची शक्यता आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नाशिकच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवरणार आहे. त्यामुळे नाशिककरांना (Nashik Water News) पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज नाशिकच्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर रविवारी नाशिकमध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा होणार नसल्यानं पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी लोकांनी आजपासूनच पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन केलं जातंय.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. आज दुपारी आणि संध्याकाळी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार
  2. रविवारी दुपारी कमी दाबानं पाणी पुरवठा

म्हणून पाणीपाणी…!

नाशिक शहरात महावितरणकडून ओव्हरहेड लाईनसह सबस्टेशनचं पावसाळ्याआधीचं काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

नाशिक पश्चिम आणि पंचवटी विभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी अशुद्ध पाण्याची मुख्य वाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबानं केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाणी जपून वापरण्याचं आवाहन…

पाणी पुरवठा कमी होणार नसल्यानं नाशिक शहरातील लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागू नये, यासाठी नागरिकांनी अतिरीक्त पाणी साठा जपून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून आधीच करण्यात आलं होतं. तसंच पाण्याची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं होतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें