AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, 10 दिवसांत 200 हून अधिक जखमी

मागच्या 10 दिवसांत 200 हून अधिक जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात अनेकांनी डोस घेतले असून अनेकांचे डोस अजून बाकी आहेत. लोकांना घरातून बाहेर पडायला सुध्दा भीती वाटत आहे.

या शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, 10 दिवसांत 200 हून अधिक जखमी
NASHIK HOSPITALImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2023 | 1:12 PM
Share

मनोहर शेवाळे, मालेगाव : शहरात (nashik malegaon city) भटक्या कुत्र्यांचा (dog attack) उपद्रव वाढला असून मोठ्यांपासून लहानांपर्यंत अनेकजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. सोयगाव, कॅम्प, संगमेश्वर, नवीन बसस्थानक, रमजान पुरासह परिसरात या भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कचराकुंड्या, उकिरडा, कत्तल खाणे, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणांचा भटक्या कुत्र्यांनी ताबा घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे नागरिक आणि शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून पालिका प्रशासनाकडे (Nashik mahapalika news) वारंवार तक्रारी करूनही या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मालेगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हौदोस मांडला

मालेगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातला आहे. रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा हे भटके कुत्रे पाठलाग करतात. यामुळे भीतीने शाळेत जाण्यास मुले टाळाटाळ करत असल्याची पालकांची तक्रार आहे. रात्री रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले असून चालतच नव्हे, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा हे कुत्रे पाठलाग करतात. एखाद्या बाईकचा मोठा होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परंतु पालिका या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

10 दिवसांत 200 हून अधिक जखमी

मागच्या 10 दिवसांत 200 हून अधिक जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात अनेकांनी डोस घेतले असून अनेकांचे डोस अजून बाकी आहेत. लोकांना घरातून बाहेर पडायला सुध्दा भीती वाटत आहे.

गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.