नाशिक महापालिका ॲलर्ट, तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न, महापौर ॲक्शन मोडमध्ये

नाशिक महापालिका तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी योगा प्रशिक्षण देणार आहे. Nashik Satish Kulkarni yoga

नाशिक महापालिका ॲलर्ट, तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न, महापौर ॲक्शन मोडमध्ये
Corona
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 6:00 PM

नाशिक: कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना आता नाशिक मनपाकडून तिसऱ्या लाटेसंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्या नंतर योगाच्या माध्यमातून लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम मनपाकडून केले जाणार आहे.याच बाबत महापौरांनी नाशिक चे प्रसिद्ध योग्य अभ्यासक विश्वासराव मंडलिक यांच्याशी चर्चा करून लहान मुलांना योगाचे धडे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. (Nashik Mayor Satish Kulkarni told that they organize Yoga for saving children form Third Wave of Corona)

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे योगाचे धडे

शहरातील वेगवेगळ्या शाळेत विडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लहान मुलांना योगाचे धडे देण्यात येण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. तसेच योग साधना कशी करावी या संदर्भात देखील ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक मधील लहान मुलांना आता योगाच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होणार आहे.

नाशिकचे महापौर अॅक्शन मोडमध्ये

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात यश आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी अ‌ॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसत आहे. नाशिकमधील लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी योगा प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याशिवाय शहरातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत.

नाशिकमधील कोरोना स्थिती आटोक्यात

महाराष्ट्रातील महानगरं कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असल्याचं चित्र समोर येतं आहे. नाशिक जिल्ह्यात आठवडा भरात कोरोना रुग्णसंख्या आणखी आटोक्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत झाला कमी झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. नाशिकमधील ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. हे दिलासादायक चित्र असलं तरी नाशिककरांसमोर मृत्यूदर कमी करणं हे देखील आव्हान आहे.

नाशिकमध्ये 5 हजार बेड रिकामे

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत कमी झाला आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत. तर ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. नाशिकमध्ये 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध असल्यानं नाशिककरांची चिंता थोडीशी कमी झाली आहे.

संबंधित बातम्या:

Corona Vaccine : कोरोनाची लस लहान मुलांसाठी कितीपत फायदेशीर?, पाहा डॉक्टर काय सांगतात

लसीकरणासाठी राज्य सरकारची समिती, शितगृहाबाबत उणिवा- आरोग्यमंत्री

(Nashik Mayor Satish Kulkarni told that they organize Yoga for saving children form Third Wave of Corona)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.