AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik MHADA scam: बोलने से सब होगा, घोटाळ्यातील 2031 घरे नाशिक म्हाडाला मिळाली, आकडा 5 हजारांवर जाणार!

नाशिकमधील म्हाडा घोटाळाप्रकरणी स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षाने वारंवार आवाज उठवला. त्याचे सुखद परिणाम आता दिसत असून, नाशिकमध्ये चक्क 157 वरून आता थेट 2031 घरे म्हाडाला (MHADA) मिळाली आहेत. हा आकडा तब्बल 5000 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nashik MHADA scam: बोलने से सब होगा, घोटाळ्यातील 2031 घरे नाशिक म्हाडाला मिळाली, आकडा 5 हजारांवर जाणार!
Jitendra AwhadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2022 | 10:50 AM
Share

नाशिकः आपण एक टीव्हीवरील जाहिरात ऐकली आणि पाहिली असेल. बोलने से सब होगा. अगदी तसेच नाशिकमधील (Nashik) म्हाडा घोटाप्रकरणी घडले आहे. याप्रकरणी स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षाने वारंवार आवाज उठवला. त्याचे सुखद परिणाम आता दिसत असून, नाशिकमध्ये चक्क 157 वरून आता थेट 2031 घरे म्हाडाला (MHADA) मिळाली आहेत. हा आकडा तब्बल 5000 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच या घरांची सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी दिली आहे. हे पाहता कुठेही अन्याय दिसला की, तुम्हीही आवाज उठवा. त्याचे फळ मिळेलच. खरे तर नियमानुसार एक एकरापेक्षा जास्त मोठ्या बांधकाम प्रकल्पात आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी 20 टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, याचे पालन न झाल्याने नाशिकमध्ये जवळपास सात हजार सदनिकांचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. याविरोधात सुरुवातीला स्वतः मंत्री जितेंद्र आव्हाडांनी वारंवार ट्वीट करून नाशिक म्हाडावर आरोपांच्या फैरी झाडल्या. विरोधी पक्ष भाजपनेही आवाज उठवला. त्याची विधिमंडळात दखल घेतली गेली. यातूनच थेट नाशिकचे तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची बदलीही करण्यात आली.

मे, जूनध्ये सोडत

नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याच्या प्रकरणात जास्तीचे घरे मिळाल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणतात की, नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे, असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरू केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आकडा अजून वाढणार

नाशिकम महापालिका क्षेत्राता म्हाडाला जवळपास सात हजार घरे मिळायला हवी होती, असा दावा यापू्र्वी करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष संख्या अवघ्या दीडशेच्या घरात होती. आता सध्या ही संख्या किमान पाच हजावर जाईल, असा अंदाज आहे. तसेच झाल्यास इतक्या कुटुंबांना अगदी कमी पैशात नाशिकमध्ये घर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, असाच घोटाळा राज्याच्या इतरही शहरात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयुक्त, अधिकाऱ्यांची चौकशी कधी?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केलेले घोटाळा प्रकरण 2013 ते 2021 या काळातील आहे. आतापर्यंत आठ वर्षांत नाशिक महापालिकेत एकूण तब्बल 9 आयुक्त येऊन गेलेत. बदली केलेले आयुक्त कैलास जाधव यांचा कार्यकाल फक्त दीड वर्षाचा आहे. मग या 9 आयुक्तांची राज्य सरकार चौकशी करणार का, असा सवाल निर्माण होत आहे. त्यात याप्रकरणी इतके दिवस मौन बाळगणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांचे काय, त्यांचावर काही कारवाई होणार काय, याप्रकरणावरही राज्य सरकारने काही स्पष्ट केले नाही.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.