नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अखेर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करायला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या 122 नगरसेवक गॅसवर असून, कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार आहे.

नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!
नाशिक महापालिका


मनोज कुलकर्णी, नाशिकः नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अखेर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करायला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या 122 नगरसेवक गॅसवर असून, कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याच्या निर्णयावर 22 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा, असे आदेश मंगळवारी महापालिकेत येऊन धडकले. त्यानुसार या कामाला बुधवारपासून (6 ऑक्टोबर) सुरुवात करण्यात आली. आयोगाने राज्यातील एकूण 21 महापालिकांना प्रभाग रचना तयार करायला सांगितली आहे. त्यासाठी कुणाच्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. नाशिकची 2011 मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी. त्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची समिती नेमावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही रचना करताना प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा जास्त केली तरी चालेल. प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी मात्र घ्यावी लागेल.

अशी होणार रचना

प्रभाग रचना करताना उत्तरेकडून ईशान्येकडे म्हणजे उत्तर-पूर्व अशी केली जाणार आहे. त्यानंतर पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे रचना करत शेवट दक्षिण दिशेकडे होणार आहे. या गुंतागुंतीच्या रचनेत कोणाचा भाग कोणाला जोडतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक नगरसेवकांनी आधीपासून आपले देव पाण्यात ठेवत प्रचार सुरू केला आहे. काही कामे केली आहेत. मात्र, त्यांचा भाग ऐनवेळी दुसऱ्याला जोडला, तर त्यांच्यासमोरची चिंता वाढणार आहे. या प्रभागांना रचनेनुसार क्रमांक दिले जातील. शक्यतो भौगोलिक सगलगात खंडित केली जाणार नाही. प्रभागातील दळणवळण, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, स्मशानभूमी, बाजाराच्या जागा, पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा, मैदाने इत्यादींचा वापर जिथे केला जातो, ते त्याच प्रभागात ठेवण्याची शक्यता आहे.

असे होतील प्रभाग तयार

महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जात आहे. त्यानुसार 14 लाख 90 हजार 53 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचे 2807 प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. यातले जवळपास 50 ते 60 प्रगणक गट एकत्र करून त्यांचा एक प्रभाग तयार केला जाईल. त्यातून 41 प्रभाग अस्तित्वात येतील. त्यात 40 प्रभागात तीन आणि एका प्रभागात दोन सदस्यीय रचना राहणार आहे.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3

सध्याचे प्रभाग

29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय

अशी राहील नवी प्रभाग रचना?

40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय

इतर बातम्याः

नारायणी नमोस्तुते! सप्तश्रृंगी गडावर रोज 28 हजार भाविकांना मिळणार दर्शन; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?

महापालिकेआधीच राजकीय धुळवड; नाशिकमध्ये 15 ऑक्टोबरपासून तब्बल 192 सहकारी संस्थांच्या निवडणुका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI