नाशिक गॅस दुर्घटना प्रकरण विधिमंडळात गाजणार? भाजप सभागृहात प्रश्न मांडण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरु होतं आहे. महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक झालं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात नाशिकच्या झाकीर हुसेन दुर्घटनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

नाशिक गॅस दुर्घटना प्रकरण विधिमंडळात गाजणार? भाजप सभागृहात प्रश्न मांडण्याची शक्यता
नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 11:18 AM

नाशिक: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरु होतं आहे. महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक झालं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात नाशिकच्या झाकीर हुसेन दुर्घटनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या नाशिक ऑक्सिजन गळतीचा मुद्दा चर्चेला भाजापकडून आणला जऊ शकतो. रामनवमी च्या दिवशी नाशिक महापालिकेच्याया झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. (Nashik Oxygen Leakage issue will be raised in Maharashtra Legislative Monsoon Session)

प्रविण दरेकर विधानपरिषेत मुद्दा मांडणार ?

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर झाकीर हुसेन दुर्घटनेबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती आहे.अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सरकार कडून याबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 23 जणांचा मृत्यू झाला.

ठेकेदारावर ठपका

नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे 23 लोकांना दुर्देवाने प्राण गमवावा लागला, अशी माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Monsoon Session Live Updates | विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात, विरोधक सरकारला घेरणार

सरकारला आदित्य, रोहित, पार्थच्या भविष्याची चिंता, गोरगरिब पोरांची नाही, आ. राम सातपुतेंचा हल्लाबोल

(Nashik Oxygen Leakage issue will be raised in Maharashtra Legislative Monsoon Session)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.