AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Kumbh Mela : या दिवशी पहिले ‘शाही स्नान’; नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर, आताच नोंद करून ठेवा

Nashik Simhastha Kumbh Mela Shahi Snan Date Declared : नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी या कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

Nashik Kumbh Mela : या दिवशी पहिले 'शाही स्नान'; नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर, आताच नोंद करून ठेवा
नाशिक सिंहस्थ कुंभमेळाImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 2:10 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.

शाही स्नानाच्या तारखा जाहीर

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीला 10 शैव आखाड्यांचे 20 महंत तर 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत उपस्थित होते. या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली.

31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.

29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात या तारखांची अधिकृत घोषणा करतील.

कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर

त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर

ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात

पहिले अमृस्नान -2-08-2027

द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027

तृतीय अमृस्नान – 12- 09-2027

नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख

31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात

पहिले अमृस्नान -2-08-2027

द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027

तृतीय अमृस्नान – 11- 09-2027

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.