परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरण, तक्रारकर्ते गजेंद्र पाटील चौकशीसाठी हजर, हाय प्रोफाईल केसचं काय होणार?

निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. Nashik Gajendra Patil RTO

परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरण, तक्रारकर्ते गजेंद्र पाटील चौकशीसाठी हजर, हाय प्रोफाईल केसचं काय होणार?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:43 PM

नाशिक: आरटीओ विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. त्या तक्रारीमध्ये गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचं देखील नाव घेतलं आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवलं असून आतापर्यंत 15 जणांना समन्स देण्यात आलं आहे.तक्रारकर्ते गजेंद्र पाटील नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. क्राईम ब्राँच गजेंद्र पाटील यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. ( Nashik suspended Road Transport Officer Gajendra Patil reach at Crime Branch of Nashik Police Commissioner office for enquiry)

गजेंद्र पाटील दोन वकिलांसह हजर

निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील दोन वकिलांसह पोलीस आयुक्तालयात हजर झाले आहेत. क्राईम ब्राँच त्यांची आज चौकशी करणार आहे. गजेंद्र पाटील आल्याने पोलीस आयुक्त कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं आहे. पाटील यांनी प्रकरणी मंत्र्यांच्या नाव तक्रारीत घेतल्यानं ही केस हाय प्रोफाईल झाली आहे. हाय प्रोफाइल केसमुळे नाशिक पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. पत्रकारांना पोलीस आयुक्त कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे.

परिवहन आयुक्तांसह 9 जणांची चौकशी पूर्ण

गजेंद्र पाटील यांनी पदोन्नती भ्रष्टयाचार प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार आतापर्यंत 15 जणांना समन्स देण्यात आलं आहे. परिवहन आयुक्तांसह 9 जणांची चौकशी पूर्ण झाली असून जबाब नोंदवले आहेत. क्राईम ब्राँचकडून आज गजेंद्र पाटील यांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. गजेंद्र पाटील यांनी पदोन्नती भ्रष्टयाचार प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आरोप फेटाळले

अनिल परब यांनी एकापाठोपाठ एक सहा ट्विट करत निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, असं परब यांनी म्हटलं आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

100 कोटींची महावसुली 300 कोटींवर?, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी

परिवहन खात्यातील कर्मचाऱ्याची मंत्र्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार; अनिल परब म्हणतात…

( Nashik suspended Road Transport Officer Gajendra Patil reach at Crime Branch of Nashik Police for enquiry)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.