ट्रम्प यांच्या सांगण्यावरून…Operation Sindoor वरून राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, इराणकडून काही धडे घ्या… का दिला सल्ला

Sanjay Raut on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. भारताने गेल्यावर्षी पाकिस्तानला या ऑपेरशनच्या माध्यमातून धडा शिकवला होता. दरम्यान संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर मोठा निशाणा साधला आहे.

ट्रम्प यांच्या सांगण्यावरून...Operation Sindoor वरून राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, इराणकडून काही धडे घ्या... का दिला सल्ला
ऑपरेशन सिंदूर, संजय राऊत
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 07, 2026 | 12:22 PM

Sanjay Raut on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला. अवघ्या चार दिवसात पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले. पण युद्ध तीव्र होत असतानाच पाकसह भारताने संघर्ष विरामाची घोषणा केली. त्यावरून उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदा हल्ला चढवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबवल्याचा आरोप त्यांनी केला.

इराणकडून धडा घ्या

यावेळी राऊतांनी मोदींवर जहरी टीका केली. मोदी यांच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण झाले असा खरमरीत टीका त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून केली. बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सांगण्यावरून युद्ध थांबलं. भारताला मोठी संधी असताना आणि पाकिस्तानमध्ये घुसून मोठे नुकसान होत असतानाच युद्ध विराम करावा लागला. अमेरिकेच्या दबावाखाली मोदी सरकार आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इराण कडून मोदी सरकारने काही धडे घायला पाहिजे असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

हिंदुत्ववादावर भाजपचा कब्जा

काल काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आली. हा कार्यक्रम पूर्ण भाजपचा झाला. भाजपने हिंदुत्ववाद्यांवर ताबा घेतला. 2029 निवडणुकीची तयारी आमची नाशिक मध्ये सुरू झाली आहे. हिंदुत्ववादी सातबारा उताऱ्याववर भाजपाचा नाव आहे त्यांना अस वाटतं. काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकवला याचा आम्ही स्वागत करतो. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला का नाही बोलावलं, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे धडे दिले. भाजपचा काय संबध आहे हिंदुत्त्वाचा असा प्रश्न विचारत धर्मध्वज वर जे चिन्ह आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागत का, सगळ्या गद्दारांना तुम्ही पक्षात घेतले अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

कुंभमेळ्यावरून गुजरातवर निशाणा

हे सरकार 35 हजार कोटी रुपयांचे काम कुंभमेळ्यात करणार असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या कामातून गुजरातच्या किती ठेकेदाराना पैसे जाणार हे तुम्ही सांगा, असा सवाल त्यांनी केला. तर नाशिकच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याची माहिती राऊतांनी दिली.

Follow Us