AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: देशभरात सगळीकडं कोश्यारी…कोणी धोतरात तर कोणी…थलपती विजयच्या अडवणुकीवर राऊतांचा कुणावर संताप?

Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकून सुपरस्टार विजय थलपती याने चमत्कार घडवला. पण अद्याप राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेसाठीचे निमंत्रण दिले नाही. त्यावरून आज नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी थेट हल्ला केला.

Sanjay Raut: देशभरात सगळीकडं कोश्यारी...कोणी धोतरात तर कोणी...थलपती विजयच्या अडवणुकीवर राऊतांचा कुणावर संताप?
संजय राऊत, थलपती विजयImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 07, 2026 | 11:56 AM
Share

Sanjay Raut on Vijay Thalapathy: तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय थलपती याच्या TVK या नव्या दमाच्या पक्षाने सर्वांनाच लोळवत सर्वाधिक जागा मिळवल्या. विजयच्या पक्षाने इतिहास घडवला. त्याने 234 पैकी 108 जागा मिळवल्या. सत्ता स्थापनेसाठी त्याला अवघ्या 10 आमदारांची गरज आहे. त्यात काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले आहेत. तर अजून पाच आमदारांची त्याला गरज आहे. असे असले तरी राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेसाठी पाचरण केले नाही. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट हल्लाबोल केला. त्यांनी तिरकस बाण सोडला. त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.

राज्यपालांकडून अडवणूक, राऊतांचा आरोप

तामिळनाडूमध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे राज्यपाल आहेत. ते भाजपचे राज्यपाल आहेत. विजय थलपती याने विजय मिळवला आहे. त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीही भाजपचे राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहेत. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपतीला बोलवत नसल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. त्यांनी भाजपवर तामिळनाडूतील घडामोडींवरुन टीका केली.

सगळीकडे कोश्यारी

विजय थलपती याला सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडत आहे. तिकडचे राज्यपाल भाजपाचे आहेत त्यामुळे त्यांनी अजून टीव्हीके ला सत्ता स्थापण करण्यासाठी आमंत्रण दिले नाही. सगळीकडे कोशयारी आहेत काही जण धोत्रात आहेत तर काहीजण सुटबुटात असल्याची टीका संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेतून केला.

ममता दीदी लढाऊ नेत्या

पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर राऊतांनी भाष्य केले. बंगालमध्ये घटनात्मक पेच होईल का नाही मी सांगू शकत नाही. देशाचे गृहमंत्री आणि राज्यपाल कुठल्याही थराला जाऊ शकतात, असा आरोप राऊतांनी केला. मी हरले नाही असं ममता दीदी म्हणतात. 100 जागा हिसकावून घेतल्या आहेत. ममता दीदी या फार मोठे आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणवर नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाची आहे. पंजाब मध्ये देखील बॉम्ब स्फोट झाला याच माध्यमातून भाजप आता तिकडे निवडणूक तयारी करत आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?