संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?

नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal election) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे

संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
Sanjay Raut_Prathmesh Gite

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal election) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.

माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिलं जात नसल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे भाजपला नाशिकमध्ये पहिला धक्का देणार आहेत. प्रथमेश गिते हे शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र ते भाजपमध्ये नाराज आहेत हे मात्र निश्चित आहे.

बाळासाहेब सानपांच्या भाजप प्रवेशाने समीकरणं बदलली 

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी डिसेंबर 2020 मध्ये भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळली.

सुनील बागुल, वसंत गिते शिवसेनेत

माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्यानंतर, खवळलेल्या शिवसेनेने (Shiv Sena Masterplan for Nashik Municipal election) आता भाजपला धोबीपछाड देण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे बडे नेते असलेले सुनील बागुल (Sunil Bagul) आणि वसंत गिते (Vasant Gite)  यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सुधाकर बजगुजरांच्या खांद्यावर जबाबदारी

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची सुत्रं हाती घेताच, पक्षप्रवेशाचा धडाका सुरु केला होता.

कोण आहेत प्रथमेश गिते? 

  • प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत
  • प्रथमेश गिते यांनी नाशिकचे उपमहापौरपद भूषवलं आहे
  • भाजपकडून त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती

संबंधित बातम्या   

संजय राऊतांच्या विश्वासू सहकाऱ्याने करुन दाखवलं, शिवसेनेत इनकमिंग सुरु

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा

स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेचा मास्टर प्लॅन तयार, वसंत गिते, सुनील बागुल समीकरणं बदलणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI