Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग, गंगापूर आणि दारणा धरणातूनही विसर्ग सुरूच!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 10:18 AM

लासलगाव : पावसाचे (Rain) माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. इगतपुरी, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील धरण क्षेत्राच्या परिसरात पावसाची थांबून थांबून रिपरिप सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून अद्यापही पाण्याचा (Water) विसर्ग सुरू आहे. यामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नांदूर मधमेश्वर धरणातून 27 हजार 980 क्युसेक पूर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे नद्यांना पूर (Flood) आलायं. तसेच या धरणातून जाकडवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलंय.

धरणातून जायकवाडीच्या दिशेने 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग

या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 35 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 80 टक्क्यांवर पोचल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातून अतिरिक्त पाणी देण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी 80 टक्क्यांवर पोहचलीयं. जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणीपुरवठा केला जातो.

गंगापूर धरणातून देखील विसर्ग सुरूच

नाशिक जिल्हात गेल्या 10 -12 दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिक जिल्हातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालीयं. यामुळे जिल्हातील अनेक नद्यांना पूर देखील आला. शेतीचेही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. नाशिक शहरामध्ये या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालायं. कारण गंगापूर धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागच्या पावसामुळे नाशिककरांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे.