AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar: SIT समोर हजर… माध्यमांचा गरडा पडताच… काय म्हणाल्या रुपाली चाकणकर… अशोक खरातविषयी थेट पहिली प्रतिक्रिया

Rupali Chakankar First Reaction on SIT: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी नाशकात दाखल झाल्या आहेत. त्यांना माध्यमांनी गराडा घातला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Rupali Chakankar: SIT समोर हजर... माध्यमांचा गरडा पडताच... काय म्हणाल्या रुपाली चाकणकर... अशोक खरातविषयी थेट पहिली प्रतिक्रिया
रुपाली चाकणकर, भोंदू अशोक खरात , एसआयटीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 10, 2026 | 12:35 PM
Share

Rupali Chakankar First Reaction on SIT: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आज नाशकात SIT चौकशीसाठी हजर झाल्या. यावेळी त्यांना माध्यमांनी गराडा घातला. पण त्यांनी सर्वांच्या प्रश्नांना अगदी शांतपणे उत्तरं दिली. याप्रकरणात त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत. त्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. भोंदू अशोक खरात संबंधित प्रश्नाचे उत्तरंही त्यांनी दिले. त्या एसआयटी टीमसमोर चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

एसआयटी चौकशीसाठी नाशकात दाखल

रुपाली चाकणकर या एसआयटी चौकशीसाठी नाशकात दाखल झाल्या. एसआयटी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. एसआयटीचा जो तपास सुरू आहे. त्यासंदर्भात त्यांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज मी आली आहे. या तपासात पूर्णपणे माझे सहकार्य असेल. तपासाला सामोरं जात असल्याने जी मदत तपास अधिकाऱ्यांना, पोलिसांना करेल. त्यांच्या प्रश्नांना निश्चितपणे उत्तर देईल, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. एसआयटी तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

खरातविषयीच्या प्रश्नावर काय उत्तर?

भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधावर आणि आरोपावरही त्यांनी उत्तर दिले. मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही असे चाकणकर म्हणाल्या.

ती खाती बनावट

तर समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. या दोन्ही पतसंस्थांमध्ये रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिणीच्या नावे खाते आढळली आहे. या खात्यातून अनेक व्यवहारही करण्यात आले आहे. दरम्यान रुपाली चाकणकर या आपल्या वकिलासह एसआयटी कार्यालयात दाखल झाल्यात. त्यांच्यासोबत वकीलही आहेत. चाकणकर या स्वतःहून या प्रकरणात नाशिकमध्ये येत चौकशीसाठी सामोरे जात आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याला गुरू मानत होत्या. त्यांचे खरात सोबतचे काही फोटोही समोर आले. त्यात त्या पाद्यपूजा करतानाचाही फोटो होतो. तर याप्रकरणात काहूर उठल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना या सर्व प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी करण्यात येत होती.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?