AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania: रात्रीच मोठी माहिती माझ्या हाती…सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, दिपक केसरकर यांचे नाव…अंजली दमानिया आता कोणता धमका करणार?

Anjali Damania on Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या SIT समोर हजर होतील. भोंदू बाबा अशोख खरात प्रकरणात त्या एसआयटीसमोर हजर होत आहेत. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भात्त्यातून अजून एक बाण काढला आहे.

Anjali Damania: रात्रीच मोठी माहिती माझ्या हाती...सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, दिपक केसरकर यांचे नाव...अंजली दमानिया आता कोणता धमका करणार?
अंजली दमानिया, रुपाली चाकणकरImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 10, 2026 | 11:39 AM
Share

Anjali Damania on Rupali Chakankar: भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींना गंडा घातला. तर अनेकांच्या जमिनी हडपल्या. याप्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी लागेबंध समोर आले. त्यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती. भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर होत आहेत. त्या नाशिक येथे पोहचल्या आहेत. थोड्याच वेळात त्या वकिलासोबत एसआयटीसमोर हजर होतील. तर त्याचवेळी अंजली दमानिया यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, दीपक केसरकरांची चौकशी करा

माध्यमांवर बघतो त्यापेक्षा खरात प्रकरणाची व्यापती मोठी आहे. या प्रकरणात केवळ ९ महिलांची चौकशी होणार असं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं.मनी लॉण्ड्रींग, चाकणकरांची चौकशी कोण करणार असा सवाल दमानियांनी विचारला. तर त्याचवेळी सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांची चौकशी कोण करणार असा सवाल पत्राद्वारे विचारल्याची माहिती त्यांनी दिली. तटकरे, शिंदे, आणि केसरकरांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा राजकीय वापर नको, खरं जनतेसमोर येणं गरजेचं असे मत त्यांनी व्यक्त केले. तर काल रात्रीही मोठी माहिती माझ्याकडे आली आहे. ही माहिती आपण एसआयटीला दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता दमानिया याप्रकरणात कोणता गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. त्याचवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठिशी खंबीर उभे होते, असा आरोप दमानिया यांनी केला.

एकट्या रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी अशी विनंती एसआयटी आणि तर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केल्याची माहिती दमानिया यांनी दिली. त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?