माझी पक्षाविषयी नाराजी केव्हा दूर होईल?, आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं

अपक्ष आमदार तांबे म्हणाले की, माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

माझी पक्षाविषयी नाराजी केव्हा दूर होईल?, आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 9:37 PM

नाशिक : नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यावेळी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेसने त्यांच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्वतः तांबेंनी कराड येथे आज आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय घडामोडीवर मोठे विधान केले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. त्यानंतर आज कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माझे कोणाशी मतभेद नाहीत

यावेळी अपक्ष आमदार तांबे म्हणाले की, माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी नाराजी तेव्हाच दूर होईल जेव्हा मला कोण चर्चेला बोलवेल. मला जर चर्चेलाच बोलावलं नसेल तर माझी नाराजी दूर कशी होईल?

हे सुद्धा वाचा

आम्ही काँग्रेसमध्ये काम करणारी लोकं

निवडणुकीच्या काळात ज्या घटना घडल्या. त्याबाबत मी वारंवार त्या त्या वेळी सांगितल्या आहेत. त्याला काही ठरावीक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले. त्याच्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. आणि पक्षाने मला बाहेर काढलं. परंतु शेवटी आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्षात काम करणारी लोक आहोत.

काँग्रेसमध्ये आमच्या कुटुंबाला शंभर वर्षे

शंभर वर्षे आमच्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये होत आहेत. माझी देखील 10 ते 20 वर्षे हे विद्यार्थी ते युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेली आहेत. त्यामुळे आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला. त्याच्या विरुद्ध आमची लढाई होती. ती अजून चालूच असल्याचे तांबे यांनी यावेळी म्हंटले.

अजूनही नाराज असल्याचे सांगितले

काँग्रेससोबत बंडखोरी केल्याचा ठपका आमदार सत्यजित तांबे यांच्यावर ठेवला जात आहे. मात्र, कराड येथे माध्यमांशी संवाद साधत असताना सत्यजित तांबे यांनी आपण अजूनही नाराजच असल्याचे सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.