AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scholarship : येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार शालांतपूर्व शिष्यवृत्ती

येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती (Scholarship) योजना डिबीटी (DBT) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शालांत पूर्व योजनेतील शिष्यवृत्ती रक्कम पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मॅन्युअली पद्धतीने जमा करण्यात येते. मात्र, राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतर (डिबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत असून, या अंतर्गत आधार क्रमांकाचे व्यापक प्रमाणात वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे.

Scholarship : येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार शालांतपूर्व शिष्यवृत्ती
प्रातिनिधिक छायाचित्र.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 21, 2022 | 7:06 AM
Share

नाशिक: येत्या शैक्षणिक वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती (Scholarship) योजना डिबीटी (DBT) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग विद्यार्थी (Student) शिकत असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना व पूर्वतयारी करावी, अशा सूचना नाशिकचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, योगेश पाटील यांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीत शालांत पूर्व योजनेतील शिष्यवृत्ती रक्कम पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मॅन्युअली पद्धतीने जमा करण्यात येते. मात्र, राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतर (डिबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत असून, या अंतर्गत आधार क्रमांकाचे व्यापक प्रमाणात वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची अधिक पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अचूक लाभ द्यावा, अशा सूचना राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिल्या आहेत.

प्रणाली कार्यान्वित करणे सुरू

सध्या शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेची डिबीटी प्रणाली कार्यान्वित करण्याचे कामकाज महाआयटी विभागाकडून केले जात आहे. दिव्यांग विद्यार्थी शिकत असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र युडीआयडी या संगणकीय प्रणालीद्वारे काढणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते काढण्याबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, योगेश पाटील यांनी केले आहे.

दिव्यांगासाठी विकास महामंडळ

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ येते. या महामंडळाची स्थापना 24 फेब्रुवारी 1997 साली झाली. हे अपंगांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम घेते. अपंगांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठीही काही संस्थाना अल्प व्याजदराने कर्ज योजना, साहित्य खरेदी करण्यासाठीही कर्ज, व्यावसायिक शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येत आहे.  दरम्यान, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयामार्फत शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यापूर्वी दोन हजार जणांना याचा लाभ मिळत होता, तो आता अडीच हजार जणांना मिळणार आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद