तीच एक व्यथा आहे… शरद पवार यांची काँग्रेसबाबतची नेमकी व्यथा काय?; पहिल्यांदाच असं का म्हणाले?

आमच्याकडे संख्या नाही. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे आज शक्ती नाही. संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही.

तीच एक व्यथा आहे... शरद पवार यांची काँग्रेसबाबतची नेमकी व्यथा काय?; पहिल्यांदाच असं का म्हणाले?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 9:56 AM

नाशिक: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या विधानाशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन घोडचूक केलीय का? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मात्र, हे भाष्य करताना त्यांनी काँग्रेसबाबतची एक व्यथाही बोलून दाखवली आहे.

शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकमधील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवार यांना नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी कशाला शिळ्या कढीला ऊत आणता असं म्हणत या विषयाला पूर्णविराम दिला.

हे सुद्धा वाचा

तो विषय संपला

तो मुद्दा होऊन गेला. एक वर्ष झालं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर नवे विधानसभा अध्यक्ष आले. आता त्यावर चर्चा करून शिळ्या कढीला कशाला ऊत आणायचा? पटोले अध्यक्ष झाले. ते सर्वांच्या पाठिंब्याने झाले. त्यानंतर जेव्हा आपण वेगळा निर्णय घेतो, तेव्हा ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा विचार घ्यायचा असतो. एवढीच व्यथा आहे. पण तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादीत फेरबदल होणार आहे काय? असा सवालही शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर आमच्याकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होईल तेव्हा ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संख्या नाही, शक्ती नाही

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे. कामलाा लागा, असे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याबाबतही पवार यांना विचारण्यात आले. कुणाला काही आवडेल. पण संख्या असली पाहिजे.

आमच्याकडे संख्या नाही. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे आज शक्ती नाही. संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

नाना पटोले काय म्हणाले?

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काल त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हा माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता असं स्पष्ट केलं. मला विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा होता.

तसेच मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा हा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. मी फक्त कार्यकर्ता म्हणून त्या आदेशाचं पालन केलं, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.

Non Stop LIVE Update
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....