AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची मोठी घोषणा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी

Nashik Municipal election : शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली.

शिवसेनेची मोठी घोषणा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी
Sudhakar Badgujar, Shivsena Nashik
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 3:14 PM
Share

चंदन पुजाधिकारी, नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (Shiv Sena) सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar)  यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली. (Shiv Sean preparation  to contest Nashik Municipal elections independent said Sudhakar Badgujar) . पुढील वर्षी नाशिक महापालिका निवडणूक होत आहे, त्यासाठी आता सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सर्व पक्षांकडून तयारी 

महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेनं चौकाचौकात शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपनं आता ‘मौका देख के चौका’ मारण्याचं ठरवलं आहे.

राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65

शिवसेना – 35

राष्ट्रवादी – 6

काँग्रेस – 6

मनसे – 6

रिपाई – 1

संबंधित बातम्या : 

नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका, शिवसेनेचा आक्षेप

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच; संजय राऊतांचा दावा 

(Shiv Sean preparation  to contest Nashik Municipal elections independent said Sudhakar Badgujar)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.