Girish Mahajan : शिवसेना सत्तेसाठी लाचार, गिरीश महाजनांचा हल्लाबोल; राऊत सोंगाड्याचे हिरो…!

शिवसेना (Shiv Sena) सत्तेसाठी लाचार झाली आहे. ते खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती देतील. किरीट सोमय्यांची जखम केवढी होती हा विषय नाही. मात्र, ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यामुळे इजा झाली. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात टोमॅटो सॉस होता. त्यांनी काय चव घेतली होती काय, असा सवाल भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांनी केला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते.

Girish Mahajan : शिवसेना सत्तेसाठी लाचार, गिरीश महाजनांचा हल्लाबोल; राऊत सोंगाड्याचे हिरो...!
गिरीश महाजन Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 4:16 PM

नाशिकः शिवसेना (Shiv Sena) सत्तेसाठी लाचार झाली आहे. ते खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती देतील. किरीट सोमय्यांची जखम केवढी होती हा विषय नाही. मात्र, ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यामुळे इजा झाली. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात टोमॅटो सॉस होता. त्यांनी काय चव घेतली होती काय, असा सवाल भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांनी केला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. महाजन म्हणाले की, झेड सिक्युरिटी असलेल्यांवर हल्ला होतो, यासाठी आमचा आक्षेप आहे. आज राज्यपालांना भेटणार आहोत. कारण तक्रार दाखल होत नाही. नवनीत राणा यांनी केलेले आरोप हे लॉकअपमधले आहेत. खार पोलीस स्टेशनमधला विषय वेगळा आहे. नवनीत राणा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध हा चौकशीचा भाग आहे. तक्रार द्या, चौकशी होऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले.

सत्तारांच्या व्हिडीओवर कारवाई करा…

गिरीश महाजन म्हणाले, पोलीस यंत्रणेचा राज्यभरात गैरवापर सुरू आहे. माझ्या बाबतीत तेच झाले. आम्ही केलेल्या स्टिंगमध्ये हे यापूर्वीच समोर आले आहे. संजय राऊत यांच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावे हे कळत नाही. सकाळ, संध्याकाळ त्यांचा भोंगा सुरू असतो. त्यांच्या म्हणण्याला लोक देखील कंटाळले आहेत. अब्दुल सत्तर यांच्या व्हिडीओवर शिवसेनेने कारवाई करून धर्म निष्ठा दाखवावी. वातावरण खराब करायचा आमचा अजिबात हेतू नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत.

सत्तेसाठी लाचार सेना…

गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लागू करावा की नाही, हा आढावा राज्यपाल घेतील. पण राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारला पूर्ण वेळ राजकारण करायचे आहे. राज ठाकरे यांच्या मागणीमुळे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांची सभा होऊ नये, असा सरकार प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या सगळ्याच भूमिका बदलल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती. ही सत्तेसाठी लाचार शिवसेना असून, खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती द्यायला तयार आहे.

आजीबाईंना सहपरिवार भेटता…

गिरीश महाजन म्हणाले, सोंगाड्यात हिरोची भूमिका संजय राऊत यांनाच मिळाली असती. मुख्यमंत्री आजीबाईना सहपरिवार भेटायला जातात, मग बैठकीला का जात नाहीत. भोंग्यांच्या बैठकीला जर मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसतील, तर उपयोग काय. तुम्हाला चिंता नाही आणि आम्ही घरून बैठकीला उपस्थित राहतो, असे चालणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. सरकारने सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केला.

भुजबळांना छोटे खाते दिले…

गिरीश महाजन म्हणाले की, मनसे – भाजप युतीबाबत सध्या कुठेही चर्चा नाही. भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. भुजबळ यांच्या पक्षाचे शहरात 6 नगरसेवक आहे. प्रशासन असल्यामुळे ते तिथे जात आहेत. हे थांबवा, ते थांबवा असं त्यांचे चालल्याचे माझ्या कानावर आले आहे. भुजबळ साहेबांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे उत्तर मिळेल. एवढे मोठे मंत्री असताना, भुजबळांना छोटे खाते दिले. चांदीवाल आयोगाचा अनिल देशमुख यांच्याबाबत आलेला अहवाल न्यायप्रविष्ट आहे. मिटकरींच्या जिभेला हाड नाही. त्यांना शरद पवारांनी कानमंत्र दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.