AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Muder: बहिणीकडून भावाचा खून; का उचललेले टोकाचे पाऊल, त्याचे हे आहे कारण…

मालेगावः भाऊ-बहिणीच्या (Brother And Sister) नात्याला काळिमा फासणारी घटना मनमाड शहरात घडली आहे. भाऊ नेहमी त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या (Murder) पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. ही घटना विवेकानंदनगर भागात मंगळवारी दुपारी घडली. संदीप गोंगे असे मृत झालेल्या भावाचे नाव आहे. ही […]

Malegaon Muder: बहिणीकडून भावाचा खून; का उचललेले टोकाचे पाऊल, त्याचे हे आहे कारण...
अंबरनाथमध्ये बेपत्ता इसमाची आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 27, 2022 | 1:17 AM
Share

मालेगावः भाऊ-बहिणीच्या (Brother And Sister) नात्याला काळिमा फासणारी घटना मनमाड शहरात घडली आहे. भाऊ नेहमी त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या (Murder) पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. ही घटना विवेकानंदनगर भागात मंगळवारी दुपारी घडली. संदीप गोंगे असे मृत झालेल्या भावाचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर भावाचा खून करणारी बहीण शोभा गारुडकर स्वतः पोलीस स्थानकात हजर झाली. यावेळी पोलीस स्थानकात तिने मी माझ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे. तिच्या जबाबनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

मृत भावाकडून बहिणीला प्रचंड त्रास दिला जात होता. त्यामुळे बहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या अनेक दिवसांपासून भावाकडून तिला त्रास दिला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून भावाला दारुचे व्यसन होते.

भावाला दारुचे व्यसन

दारु पिऊन आल्यानंतर तो आपल्या बहिणीला शिव्या देत होता. तो नेहमीच बहिणीला शिवा देत होता. दारू पिऊन त्याने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला समज देण्यात आली होती.

रागाच्या भरात कृत्य

मात्र तो दारुच्या आहारी गेल्यामुळे तो ऐकण्याची मनस्थितीत नव्हता. बहीण भावाचे वाद टोकाला गेल्यानंतर बहिणीकडून रागाच्या भरात त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. रागाच्या भरात बहिणीकडून हे कृत्य झाल्यामुळे घटना घडल्यानंतर बहीण स्वतःहून पोलीस स्थानकात हजर होऊन तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली.

बहिणीवर दुःखाचा डोंगर

गेल्या अनेक दिवसांपासून मृत व्यक्तिची बहीण माहेरी राहण्यासाठी आली होती. कोरोना काळात तिच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळेही ती दुःखी होती. त्यातच या दोघा बहीण भावांची आई आजारी असल्याने तिची काळजी घेण्यासाठी म्हणून बहीण आई जवळ येऊन थांबली होती. मात्र या काळात भाऊ नेहमी बहिणीबरोबर भांडत होता. गेल्या अनेक दिवसांपासून दारू पिऊन येऊन बहीणबरोबर भांडत असल्याने बहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार