AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोनवेळा बिबट्याने शिकार करण्याचा प्रयत्न केला, कुत्र्याच्या भुंकण्यामुळं लोकांना जाग आली, पण…

nashik news : नाशिक जिल्ह्यात बिबट्या मोठ्या प्रमाणात असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याच्या रोज घटना उजेडात येत आहेत.

दोनवेळा बिबट्याने शिकार करण्याचा प्रयत्न केला, कुत्र्याच्या भुंकण्यामुळं लोकांना जाग आली, पण...
nashik igatpuri leopardImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 06, 2023 | 8:40 AM
Share

इगतपुरी : महाराष्ट्रात जशी ऊसाची शेती वाढली, तसं बिबट्याचं (Igatpuri leapard) राहण्याची व्यवस्था झाली असं अनेकजण म्हणत आहेत. कारण एकदा ऊसाच्या शेतीचा आसरा बिबट्याला मिळाली की, तो ती जागा शक्यतो सोडत नाही. तिथं काही ना काही शिकार करुन तो राहत असतो. बिबट्याने (nashik leopard) आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा जीव देखील गेला आहे. तोचं शेतातला बिबट्या (maharashtra nashik leopard news in marathi) आता शिकारीच्या शोधात घराच्या आजूबाजूला फिरत आहे. काल इगतपुरी तालुक्यात बिबट्या दोनवेळा घराच्या अंगणातून परतला असल्याचं नागरिक सांगत आहेत.

बिबट्याचा मुक्त संचार

इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास बोरटेंभे येथील भानुदास नवले यांच्या घरासमोरील अंगणात बिबट्या आला, त्यावेळी बिबट्याला पाहून कुत्रे जोरात ओरडू लागले. नवले कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ घराचे पत्रे वाजवले असता बिबट्या पळून गेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दुसऱ्यांचा बिबट्या दबक्या आला…

मात्र पुन्हा पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बिबट्या परत त्याचं ठिकाणी दबक्या पावलाने आला. त्याने पिंजऱ्यातील कुत्र्याला भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे परत जोरात भुंकू लागल्याने त्यांनी बाहेरील लाईट चालू केली. लाईट चालू झाल्यावर बिबट्याने धूम ठोकली. येताना आणि जाताना बिबट्याचा मुक्त संचार त्यांनी लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा नाही

या घटनेमुळे त्या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा नसल्याचे सांगितले यामुळे परिसरातील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...