
नाशिक उद्धव ठाकरे शिवसेनेला काल मोठं खिंडार पाडलं. 43 वर्षांपासूनचे निष्ठावान शिवसैनिक विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण हे दोन्ही माजी महापौर राहिले आहेत. नाशिकमध्ये त्यांना मानणारा हा एक मोठा वर्ग आहे. नाशिकमधल्या कालच्या पक्ष फुटीनंतर आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. 21 वर्षाच्या महिला उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल. ठाकरेंच्या सेनेत काल मोठी फूट पडल्यानंतर आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास नाशिकमध्ये सुरुवात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तरुणांना नाशिक मध्ये संधी दिली जाणार आहे. आज 21 वर्षाच्या महिला उमेदवाराकडून आपला पहिला उमेदवारी अर्ज ठाकरे गटाकडून दाखल.
“कोणी गेल्याने पक्ष संपत नाही. भुजबळ गेले, राणे गेले. पण आज कुठे दिसत नाहीत. उद्धव ठाकरेंच्या पक्षावर भाजप घाव का घालते? हा प्रश्न आहे. त्यांना भीती महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे ते पक्ष फोडतात” असं वसंत गीते म्हणाले. “काल गेलेला माणूस हा काही मोठा विषय नाही. ज्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता येत नाहीत, त्यांना लोक काय करतील. उद्या आदित्य ठाकरे नाशिकला येत आहेत, मेळावा घेतील. आम्ही घटक पक्षांसोबत बोलणी करत आहोत, बोलणी शेवटच्या टप्प्यात आहेत” अशी माहिती वसंती गीते यांनी दिली.
ते काल पर्यंत माझे सहकारी होते
“कुठेही वाद नाही, काही ठिकाणी वाद असतील तर मार्ग काढू. जो सक्षम उमेदवार असेल, त्याची निवड पक्ष करतो. अनेक वर्ष ज्याने सतरंज्या उचलल्या, झेंडे लावले त्यांची ही निवडणूक आहे. ते काल पर्यंत माझे सहकारी होते, त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे” असं वसंत गीते म्हणाले.
काँग्रेसचे पदाधिकारी आज मुंबईत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या एकत्रित झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे पदाधिकारी आज मुंबईत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट. नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्याची स्थानिक काँग्रेसने दाखवली तयारी. नाशिक महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेस पदाधिकारी आज ठेवणार हायकमांड समोर.