AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा उत्साह, तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतिक्षित मंदिराचं आज लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात कुटुंबासह जाऊन श्रीरामांचं दर्शन घेतलं.

अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा उत्साह, तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत
| Updated on: Jan 22, 2024 | 6:25 PM
Share

नाशिक | 22 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं आज लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरे यांचा आज नियोजित नाशिक दौरा असल्याने ते अयोध्येला गेले नाहीत. आपण अयोध्येला मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत, पण नंतर नक्की जाणार, असं उद्धव ठाकरेंनी याआधीच स्पष्ट केलं होतं. तसेच अयोध्येला 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी आपण काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार असल्याचं ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलेलं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांचं दर्शन घेतलं.

नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे यांनी सपत्निक पूजा केली. यावेळी पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चार करण्यात आला. अतिशय मनोभावे श्रीरामांची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, त्यांचा भाऊ तेजस ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात पूजा केली. त्यानंतर काळाराम मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे गोदातीरी महाआरतीसाठी रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. मोदी यांनीदेखील नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. यावेळी मोदींनी काळाराम मंदिराच्या परिसरात स्वत: साफसफाई केली होती. मोदींचा काळाराम मंदिरात साफसफाई करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आज उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे खूप दिवसांनंतर आज नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय.

उद्धव ठाकरेंची उद्या नाशिकमध्ये सभा

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी महाआरती करण्यात येत आहे. त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये भव्य सभा पार पडणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे नेमकी काय-काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर उद्या आपल्या भाषणात काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.