नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Corporation election) तोंडावर सत्ताधारी राज्य सरकारने (State Goverment) लोकोपयोगी योजनांचा बार उडवणे सुरू केले आहे. त्या धरतीवर नाशिकरोडला (Nashikroad) थेट दारणा धरणातून (Darna Dam) पाणीपुरवठा (Water supply) करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, कळवणला सौरऊर्जेवरील २५ कोटींची पाणीपुरवठा योजना साकारली जाणार आहे.

नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा
नाशिक महापालिका

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Corporation election) तोंडावर राज्य सरकारने (State Goverment) लोकोपयोगी योजनांचा बार उडवणे सुरू केले आहे. त्या धरतीवर नाशिकरोडला (Nashikroad) थेट दारणा धरणातून (Darna Dam) पाणीपुरवठा (Water supply) करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, कळवणला सौरऊर्जेवरील २५ कोटींची पाणीपुरवठा योजना साकारली जाणार आहे. (Water supply from Darna dam to Nashik Road, Water supply on solar energy to Kalvan, Announcement before Nashik Municipal Corporation election)

नाशिक महापालिकेची निवडणूक ऐन तोंडावर आली आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनीही कंबर कसली आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना नाशिकरोडवासीयांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मंत्री शिंदे यांनी थेट दारणा धरणातून नाशिकरोडसाठी जलवाहिनी टाकण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गंगापूर, मुकणे पाठोपाठ आता दारणा या तिसऱ्या धरणातू थेट जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याचा हा तिसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

जुन्या जलवाहिन्या बदलणार

सध्या नाशिकरोडला दारणा धरणातूनच पाणीपुरवठा होतो. मात्र, चेहडी बंधाऱ्याजवळ मलयुक्त घाण पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दारणातून थेट नाशिकरोडपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. सोबतच गंगापूरमधून नाशिकला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाच्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिल्याचे समजते.

कळवणसाठी २५ कोटींची योजना

कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेस नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांना दिले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २५ कोटी खर्चून ही योजना साकारली जाणार आहे. त्यामुळे शहरातील १७ प्रभागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. चणकापूर प्रकल्पस्थळावरून नियोजित असणारी आणि सौरऊर्जेवर कार्यान्वयित होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच पाणीपुरवठा योजना आहे. (Water supply from Darna dam to Nashik Road, Water supply on solar energy to Kalvan, Announcement before Nashik Municipal Corporation election)

संबंधित बातम्याः

नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार

…तर आम्ही गपचूप बसणार नाहीत, भविष्यात शब्द जपून वापरा, नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा राणेंना इशारा

VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI